रब्बी कांद्याला खंडित वीजपुरवठा
By admin | Published: January 7, 2017 12:33 AM2017-01-07T00:33:31+5:302017-01-07T00:33:31+5:30
वेळापत्रक कोलमडले : शेतात पाणी भरण्यासाठी शेतक:यांची धडपड
पिंपळनेर : सद्य:स्थितीत रब्बी हंगामास वेगात सुरुवात झाली असून कांदा लागवड अंतिम टप्प्यात असल्याने पीक जगवण्यासाठी रात्रंदिवस शेतात पाणी भरण्यासाठी शेतक:यांना थंडीत जावे लागते. त्यातच पाण्याचे वेळापत्रक देऊनसुद्धा त्यात मोठय़ा प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असून अखंडित वीज मिळावी, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे.
रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतक:यांनी गहू, कांदा, मका, ऊस यांची लागवड केली आहे. पिकांना योग्यवेळी पाणी मिळावे यासाठी शेतक:यांची पाणी भरण्यासाठी धडपड सुरू आहे. यात वीज वितरण विभागाने कृषीसाठी स्वतंत्र लाईनचे आठवडय़ाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र शेतक:यांना त्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा केला जात असला तरी त्या वेळेतच असंख्य वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच रात्री-पहाटे फ्यूज उडून जात असल्याने फ्यूज नव्याने टाकावा लागतो. पाण्याचा भरणा योग्यवेळी पूर्ण होत नाही. शेतक:यांना थंडीत पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्या शेतक:यांना येत आहेत.
सध्या शेतक:यांना रब्बी हंगामासाठी सोमवार ते गुरुवार रोज रात्री 12 ते सकाळी 10 वाजेर्पयत वीजपुरवठा सुरू असतो. तर शुक्रवार ते रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेर्पयत पुरवठा देण्यात आला आहे. यात सोमवार ते गुरुवार ही जी रात्रीची वेळ वीज मंडळातर्फे देण्यात आली आहे त्यातही रात्री ब:याच वेळा पुरवठा खंडित होतो. तसेच फ्यूज उडतो. म्हणजे जे शेतकरी रात्री-पहाटे शेतात पाणी भरतात त्यांना या अडचणी येतात. तसेच रात्री-पहाटे शेतात लाईट गेल्यानंतर शेतात थांबून राहावे लागते. विजेची वाट पाहावी लागते. रात्रीच्या वेळी थंडी, तसेच विंचूकाटय़ाची, साप, जनावरे यांची भीती असते. रात्री फ्यूज उडाला तर वायरमन रात्री येत नाहीत. पाणी भरणे थांबते. यामुळे पिकं खराब होतात.
सोमवार ते गुरुवार रात्री 12 ते सकाळी 10 वाजेर्पयत जी वीज मिळते ती 10 तास मिळते. तर शुक्रवार ते रविवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेर्पयत म्हणजे आठ तास वीज मिळते. शेतक:यांची मागणी आहे की, जी रात्रीची वीज मिळते ती दिवसा करावी, त्यामुळे शेतक:यांना पाणी भरणे सोपे होणार आहे.
सरकारने दिवसा 12 तास लाईट द्यावी. रात्रीच्या वेळी जीवाला धोका असतो. नुकत्याच पाच दिवसांपूर्वी इनाम शिवारात तरस मयत आढळून आला. यामुळे शेतक:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.