साक्री येथे रक्तदान शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:58 PM2020-07-29T12:58:07+5:302020-07-29T12:59:27+5:30
कृषी मंत्र्यांची उपस्थिती : बांधावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुका शिवसेना व आमदार मंजुळा गावित यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, तालुका प्रमुख विशाल देसले, साक्री तालुका विधानसभा संघटक पंकज मराठे व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
साक्री येथील विश्रामगृहात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनाअगोदर कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळेस काटवान भागातील शेतकºयांनी शिवसेना तालुका प्रमुख विशाल देसले यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. फळपीक विमा योजनेसंदर्भात साक्री तालुक्यातील शेतकºयांवर मोठा अन्याय होत असून तालुक्यातील इतर मंडळांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतू कासारे, साक्री परिसरातील फळबाग लागवड करणाºया शेतकºयांना फळपीक विमा लाभ मिळालेला नाही. तरी शेतकºयांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी शेतकºयांनी केली. तसेच तालुक्यातील अनेक शेतकºयांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक पंकज मराठे, बाळा शिंदे, बंडू गीते आणि शिवसैनिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.