दिव्यागांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 10:47 PM2020-12-29T22:47:06+5:302020-12-29T22:47:25+5:30
शिरपूर : करवंद येथे शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत तरुणांनी 'चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया' या मोहिमंतर्गत रक्तदान शिबिर ...
शिरपूर : करवंद येथे शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत तरुणांनी 'चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया' या मोहिमंतर्गत रक्तदान शिबिर घेतले. यास तरुणांसह ग्रामस्थांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथमत: दिव्यांगांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी ५२ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिरात महिलांचा देखील सहभाग लाभला.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर करवंद येथे रक्तदान शिबिर पार पडले. सुरुवातीला प्रदीप पाटील आणि हरपालसिंग राऊळ या दिव्यांसह जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंद्र पाटील यांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. या शिबिरासाठी जीवन ज्योती ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. शिबिरात हर्षली राऊळ व ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री धाकड या तरुणींनी सहभाग नोंदविला.
शिबीरात गावातील तरुणांनी रक्तदान करुन प्रतिसाद दिला. रक्तदात्यांसाठी ग्रामसेवक आनंदा पाटील आणि योगेंद्रसिंग राऊळ यांनी दूध आणि फळांचे वाटप केले. माधवसिंग राऊळ यांनी पिण्याच्या पाण्याची तर संदीप राऊळ यांनी खुर्च्यांसह बैठक व्यवस्था केली. शिबिरासाठी सुरेश सोनार, गणेश बोरसे, जयेंद्रसिंग राऊळ, माजी उपसरपंच अशोक पाटील, फकरुद्दीन जमादार, रणछोड शिंपी, सुनील भाईदास पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी आनंदसिंग राऊळ, प्रेमसिंग राऊळ, अशोक भाईदास पाटील, अण्णा वाणी, चेतन माहेश्वरी, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पाटील, राकेश पाटील उपस्थित होते. शिबिराचे संयोजन गोपालसिंग राजपूत व मित्र परिवाराने केले.