महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:30 PM2020-05-18T21:30:19+5:302020-05-18T21:30:45+5:30
जिल्हा प्रशासन : जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह ७१ जणांनी केले रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात सोमवारी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ जिल्हाधिकारी संजय यादव यांनी स्वत: रक्तदान करुन या शिबीराचे उद्घाटन केले़
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांना प्रतिसाद म्हणून महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले. रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे आजच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवसभरात किमान १०० जण रक्तदान करतील, असा विश्वाास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त करीत सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी रक्तदान करावे. आवश्यकता भासली तर नागरिकांनी रक्तपेढीत जावून रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले़
गेल्या काही दिवसांपासून रक्ताची टंचाई जाणवत आहे. ही बाब जिल्हाधिकाºयांनी महसूल अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून देत रक्तदान करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी रक्तदान शिबिराची पार्श्वभूमी विशद केली. कोणतीही आपत्ती असो, महसूल विभागाचा कर्मचारी मदतीसाठी पुढे असतो. आजच्या रक्तदान शिबिरातही हा कर्मचारी पुढेच आहे, असे त्यांनी सांगितले. धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मन्सूर शेख, उपाध्यक्ष छोटू चौधरी, सचिव अविनाश सोनकांबळे, सहसचिव योगेश जिरे, कोशाध्यक्ष उमेश नाशिककर, संजय शिंदे, श्रीकांत देसले, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. वाय. कुलकर्णी, चिटणीस वाय. आर. पाटील, राज्यस्तरीय सदस्य एस. बी. मोहिते, ए. ए. भामरे, कार्याध्यक्ष सी. यू. पाटील आदींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
रक्तदान करताना सुरक्षीत अंतर ठेवले होते़