अनैतिक संबंधातून भवरे येथील महिलेचा खून

By admin | Published: April 20, 2017 12:37 AM2017-04-20T00:37:25+5:302017-04-20T00:37:25+5:30

सहा दिवसांनी गुन्हा उघड : दोन जणांना अटक, चाºयाच्या गंजीत आढळला होता मृतदेह

The blood of a woman from Bhavare in connection with immoral relations | अनैतिक संबंधातून भवरे येथील महिलेचा खून

अनैतिक संबंधातून भवरे येथील महिलेचा खून

Next

नवापूर : भवरे शिवारातील शेतात १४ एप्रिल रोजी चाºयाच्या गंजीत सापडलेल्या महिलेचा अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पानबारा येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.
शिवाजी बाबाजी गावीत (४७) रा.पानबारा व योहान जत्र्या गावीत (३७) रा.भवरे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस  सूत्रांनुसार, भवरे येथील लक्ष्मण गोपू कोकणी यांच्या शेतातील चाºयाच्या गंजीत १४ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा गळा चिरलेला होता तर आजूबाजूला चाकू व बियरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. महिलेची ओळख पटविण्याचे आवाहनदेखील करण्यात आले होते.  दरम्यान १५ रोजी पांघराणजवळील होलीपाडा येथील २२ वर्षीय युवकाने आपली आई १२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे खबर नवापूर पोलिसात दिली. पोलिसांनी मयत महिलेचे कपडे युवकाला दाखविल्यावर त्याने ते ओळखले. त्यानंतर मयत महिलेची ओळख पटली. पोलिसांनी या महिलेचा खून का व कोणी केला याचा तपास सुरू केला.
मयत महिला ही दररोज सकाळी सात वाजता शहरात येऊन सात ते आठ ठिकाणी धुणी-भांडी करीत होती. सायंकाळी ती परत घरी जात असे. तिचा पती १५ वर्षांपासून लकव्यामुळे घरीच राहत असे. एक मुलगा छापरी येथे मावशीकडे तर दुसरा तिच्यासोबत राहत होता. मुलगी सुरत येथे कामास होती. १२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला फोन आला त्यानंतर ती घराबाहेर पडली, ती परत आलीच नसल्याचे सांगितल्यावर महिलेच्या फोन नंबरवरून काही माहिती मिळते का त्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांच्यासह पथकाने सुरू केला. त्यानुसार त्यांना पानबारा येथील शिवाजी बाबाजी गावीत (४७) याच्यावर संशय आला. त्याची कुंडली काढल्यानंतर पानबारा येथे पोलीस गेल्यावर तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्याला ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्यानेच महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्यातून महिला वारंवार पैशांची मागणी करीत होती. त्याला कंटाळून आपण १२ एप्रिल रोजी दुपारी महिलेने फोन केला व ६० हजार रुपयांची मागणी केली. दुपारी तिला पालिका कार्यालयाजवळ भेटण्यास बोलविले. त्यांच्यात बोलणे झाल्यानंतर त्यांनी दारूच्या दुकानातून बिअर विकत घेतली.
चालतच ते घोडजामणे येथे गेले. तेथून भवरे येथील योहान जत्र्या गावीत यास सोबत घेतले. त्याच्या दुचाकीवर बसून ते भवरे येथे पोहचल्यावर योहानच्या शेतात उतरून एक किलोमीटर अंतरावरील लक्ष्मण कोकणी यांचे शेत गाठले. तेथे बिअर घेतल्यानंतर त्यांच्यात पैशांच्या मुद्यावरून वाद झाला. रागाच्या भरात शिवाजी याने बिअरची बाटली फोडून पोटावर व गळ्यावर वार केला. त्यात महिलेचा मृत्यू झाला. इकडे योहान वाट पाहून थकल्यावर तो त्यांना पाहण्यास गेला असता शिवाजी गावीत हा महिलेचा मृतदेह ओढताना आढळून आला.
 झोपडीच्या बाजूला असलेल्या चाºयाच्या गंजीत त्याने मृतदेह लपविला. त्यानंतर योहान याने त्याच्या दुचाकीवरून शिवाजी यावीत यास देवळफळी येथे सोडून परत भवरे येथे गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी दिली. त्यावरून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.(वार्ताहर)

दोघा आरोपींना
सात दिवसांची कोठडी
अटक करण्यात आलेल्या शिवाजी बाबाजी गावीत व योहान जत्र्या गावीत यांना बुधवारी नवापूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींना शिताफीने अवघ्या चार दिवसातच अटक करण्यात नवापूर पोलिसांना यश आले. या घटनेतील महिलेची ओळख, अज्ञात आरोपींपर्यंत पोहचण्याचे दिव्य या बाबी पोलिसांपुढे आव्हान होत्या. परंतु पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावला.
-रामदास पाटील,
पोलीस निरीक्षक, नवापूर.

Web Title: The blood of a woman from Bhavare in connection with immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.