मार्निंग वाक केल्यास शरीर निरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:05 PM2018-12-08T18:05:12+5:302018-12-08T18:05:46+5:30

भूपेशभाई पटेल : आरोग्य शिबीरात ५२८ रूग्णांची डोळे तपासणी

The body is healthy by making a speaking sound | मार्निंग वाक केल्यास शरीर निरोगी

मार्निंग वाक केल्यास शरीर निरोगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : प्रत्येकाने मार्निंग वाककरीता किमान अर्धा तास द्यायला हवा़ चांगले शरीर राहीले तर मुले देखील चांगले राहतील, जेणेकरून तब्बेत देखील निरोगी राहील़ आजारी पडणार नाही याची काळजी घ्या़ प्रत्येकाने घरातील ज्येष्ठाचा सन्मान ठेवून आदर ठेवा, चरणस्पर्श करा तसे केल्यास मंदिरात देखील जाण्याची आवश्यकता नाही आणि संस्काराचे दर्शन घडेल असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी येथील खालचे गावात घेण्यात आलेल्या विकास योजना आपल्या दारी अभियान व ७९ वे आरोग्य शिबीरात मार्गदर्शन करतांना केले़
डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील खालचेगाव बौद्धवाडा येथे आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन, तालुका युवक काँग्रेस, शंकरा आय हॉस्पीटल यांच्या वतीने ७९ वे आरोग्य शिबीर तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले़ सुरुवातीस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. 
यावेळी उद्योगपती तपनभाई पटेल, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, लक्ष्मण पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन गिरासे, राजेंद्र अग्रवाल, गोपाल भंडारी, उत्तम माळी, शैलेंद्र अग्रवाल, राजेश भंडारी, केशव सावळे, नगरसेवक गणेश सावळे, पिंटू शिरसाठ, भटू माळी, महादू गवळे, सुकलाल खैरनार, बाबबुराव खैरनार, आनंदा खैरनार, रोहिदास थोरात, भाईदास मोरे, रमेश थोरात, फिरोज शेख, रज्जाक कुरेशी, गुलाब भोई, नवनीत राखेचा, इर्फान मिर्झा, जाकिर शेख, नगरसेवक देवेंद्र राजपूत,  विनायक वाघ, राजेंद्र पाटील, सुरेश अहिरे, हिरालाल मराठे,  संजय राजपूत, रावसाहेब पाटील, सुभाष भोई, विनोद शर्मा, रमेश वानखेडे, सिद्धार्थ पवार, प्रा.सी.एच.निकुंभे,   प्रभाकर सोनवणे, बिपीन तेले, सुभाष गवळी, अरुण थोरात, गौतम थोरात आदी उपस्थित होते.
या शिबीरात ५२८ जणांची डोळे तपासणी करण्यात आली. १२५ जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. अनेक जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.
सुत्रसंचालन जयवंत पाडवी तर आभारप्रदर्शन नगरसेवक गणेश सावळे यांनी केले़ कार्यक्रमाचे आयोजन जयभीम बहुउद्देशीय अ‍ॅण्ड स्पोर्टींग प्रतिष्ठानने केले होते़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल ढिवरे, दिपक नगराळे, विशाल खैरनार, दिनेश सावळे, दिपक अहिरे, मनोज शिरसाठ, योगेश सावळे, सागर थोरात, भैया थोरात, विक्रांत भावसार, दिनेश शिरसाठ, संदिप अहिरे, प्रमोद शिरसाठ, मयूर आगळे, संदिप थोरात, राकेश थोरात, श्रीराम थोरात, दिपक थारोत, राकेश शिरसाठ, अमृत ढिवरे, पंकज थोरात यांनी परिश्रम घेतलेत़

Web Title: The body is healthy by making a speaking sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे