धुळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 11:52 IST2018-08-28T11:51:08+5:302018-08-28T11:52:27+5:30
जामचा मळा परिसर : घातपाताचा संशय

धुळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला
ठळक मुद्देजामचा मळा परिसरात आढळला मृतदेहघातपाताचा व्यक्त होतोय संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवरील जामचा मळा परिसरात सोमवारी रात्री तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे़ यामागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे़
चाळीसगाव रोडवरील जामचा मळा परिसरात असलेल्या बाबा नगरात राहणारा सोहल आसीफ अन्सारी हा २० वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळून आला होता़ ही घटना सोमवारी मध्यरात्रीची आहे़ तो वेल्डींग काम करत होता़ अचानक त्याचा मृत्यू झाल्यामुळे बाबा नगरात हळहळ व्यक्त होत आहे़