बोगस डॉक्टरांची शोध मोहिम रखडली
By admin | Published: June 13, 2017 03:52 PM2017-06-13T15:52:18+5:302017-06-13T15:52:18+5:30
शिरपूर तालुक्यात 22 बोगस संशयित डॉक्टर, बदल्यांच्या वा:यांमुळे रूग्णांच्या जीवाशी खेळ
Next
सुनील साळुंखे/ ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.13 - आदिवासी दुर्गम भागातील गाव-पाडय़ांवर तर पश्चिम बंगालमधून बोगस पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांसह तसेच कंपाऊडंर यांच्याकडून रुग्णसेवा सुरु असताना आरोग्य विभागातर्फे बोगस डॉक्टरांची शोध मोहिम मात्र थंडावली आहे.
राज्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कृती कार्यक्रम राबवला जात आह़े या पाश्र्वभूमीवर तालुक्यात 5 बोगस डॉक्टरांवर गुन्हे देखील नोंदविण्यात आले आहेत़ त्यानंतर देखील बोगस डॉक्टरांचा वावर थांबलेला दिसत नाही़ पश्चिम बंगालमधील काही तरूण शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत़ विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडर म्हणून परिचित झालेले स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत़ या बोगस डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र व वैद्यकीय पदवी नसून आदिवासी भागातील जनतेवर विविध प्रकारच्या इंजेक्शन सलाईनद्वारे आदिवासी जनतेवर उपचार करीत आह़े आदिवासी अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत बोराडी परिसरात किमान 25-30 डॉक्टर बिनधास्तपणे रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत़ बहुतांशी डॉक्टरांकडे होमिओपॅथीची पदवी असतांनाही ते अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत़ पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार हे कळताच ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून काही दिवस गायब राहता़
तालुक्यात 22-25 संशयित बोगस डॉक्टरांची यादी आरोग्य विभागाला प्राप्त झाली आह़े शहराची यादी उपजिल्हा रूग्णालय अथवा नगरपालिका प्रशासनाकडे आहे. विशेषत: शहरातही असे बोगस डॉक्टर आह़े संबंधित विभागाकडे अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी फौजफाटा नाही, अधिका:यांना कारवाई करण्यासाठी वेळ नाही, सुदैवाने धाड टाकण्यापूर्वीच असे डॉक्टर तेथून फरार होतात़ त्यामुळे पुन्हा धाड टाकण्यासाठी धजावत नसल्यामुळेच अशा बोगस डॉक्टरांचा व्यवसाय फोफावत आह़े
यांची होते तपासणी़़़
डॉक्टरांची पदवी, मेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रेशन, दवाखान्याचा परवाना, फायर सुरक्षा, कर्मचा:यांची सुची, पदवीप्रमाणेच डॉक्टरांकडून होणारी रूग्णांची तपासणी आदी बाबत पथक शोध घेत़े एका दवाखान्याच्या तपासणीसाठी एक तास कालावधी लागतो, त्यामुळे शहरासह तालुक्यातील बहुतांशी डॉक्टरांची तपासणी होवू शकलेली नाही़
शहरातील मोठय़ा रूग्णालयांवर पथकाची करडी नजर राहणार असून तपासणी करतांना कर्मचारी सूची, कुशल-अकुशल कर्मचा:यांच्या नोंदी, सोनोग्राफी केंद्राची अधिकृत मान्यता, रूग्णालयातील जैविक कच:याची विल्हेवाट याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यात येणार आह़े त्रुटी असणा:या रूग्णालयांना लेखी नोटीसा बजावल्या जातील असेही सांगण्यात आल़े
नर्सिग अॅक्टनुसार नोंदणी़़़
ग्रामीण भागात डॉक्टरांच्या नावाच्या पाटय़ा जागोजागी असतात, मात्र शोध पथक गावात येणार असल्याचे कळतास बोगस डॉक्टर गायब होत असल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली आह़े मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, बॉम्बे नर्सिग अॅक्टनुसार डॉक्टरांना नोंदणी आवश्यक आह़े याची अधिकृत मान्यता असल्याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणे कायद्याने गुन्हा आह़े त्याचप्रमाणे नगरपालिका, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, फायर सुरक्षा या विभागांच्या परवानग्या घेणेही डॉक्टरांना बंधनकारक असल्याची बाबत आरोग्य विभागाने स्पष्ट केली आह़े
आरोग्य विभागात बदल्यांचे वारे वाहु लागल्यामुळे बोगस डॉक्टरांची शोध मोहिम तुर्त स्थगित आहे. येत्या आठवडय़ापासून सुरू केली जाणार आह़े या शोध पथकात वरिष्ठ शोध पथकाचे अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधीक्षक, पोलीस अधिकारी यांचा समावेश असणार आह़े रूग्णालयांची सखोल तपासणी केली जाणार आह़े ग्रामीण भागात काही ठिकाणी सापळा लावून शोध मोहिम राबविण्याचे नियोजन केले आह़े
- डॉ़भरत पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरपूर