बोराडी परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 08:43 PM2020-10-03T20:43:05+5:302020-10-03T20:43:24+5:30

अनेक घरांवरील पत्रे उडाले : तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत, खरीप हंगाामचेही झाले नुकसान

The Boradi area was lashed by rains | बोराडी परिसराला पावसाने झोडपले

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बोराडी :बोराडीसह परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. तसेच झाडे पडल्याने, खांबावरील वीज तारा तुटल्या. अनेकांच्या घरात पाणी साचले. सुदैवाने या वादळी पावसात जीवीतहानी झाली नाही.
वादळी पावसामुळे चाकडू येथील अरुण मणीलाल पावरा, मणिलाल मुरलीधर पावरा, रंगलिबाई सनवाºया पावरा यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. त्यामुळे घरातील सदस्यांना बाहेरच रात्र काढावी लागली. काहींच्या घरातील टीव्ही संचामध्ये पावसाचे पाणी गेल्याने त्यांचेही नुकसान झाले. घरावरील पत्रे उडाल्याने पाणी साचून घरातील साहित्य पूर्ण भिजले.वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही झाडे खांबावर पडल्याने खांब वाकले. वीज तारा तुटल्या. त्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता.

Web Title: The Boradi area was lashed by rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.