बोराडी शंभर टक्के लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:06 PM2020-04-16T21:06:41+5:302020-04-16T21:07:03+5:30
प्रतिबंधात्मक उपाय : जंतूनाषक औषधांची नियमीत फवारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी बोराडी गाव गुरूवारी शंभर टक्के लॉकडाउन करण्यात आले होते़ भाजीपाला मार्केट व बँकेत गर्दी होवू नये यासाठी बोराडी ग्रामपरिषदेचे उपसरपंच राहुल रंधे यांनी हा निर्णय घेतला होता़ त्यांनी केलेल्या आवाहनाला गावकऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचे चित्र होते़ एका दिवसाच्या कडेकोट लॉकडाउनमध्ये स्टेट बँकेत खातेदारांना सुरक्षीत अंतर ठेवून उभे करण्यात आले होते़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बोराडी ग्राम परिषदेच्या वतिने दक्षता घेतली जात आहे. गावात चार यंत्रांच्या सहाय्याने नियमीतपणे जंतूनाषक औषधांची फवारणी करण्यात येत आहे.
तसेच जनधन खात्यामध्ये जमा झालेले कोरोनाचे पाचशे रुपये काढण्यासाठी गर्दी करु नये, प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसारच नागरीकांनी पैसे काढण्यासाठी बँकत यावे़ यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन केले आहे़