बोराडीतील पडीक घरातून दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:16 PM2019-04-12T17:16:06+5:302019-04-12T17:16:47+5:30
५४ हजारांचा मुद्देमाल : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
शिरपूर : बोराडी येथील एका पडीक घरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून दारु बनविण्याचे साहित्य आणि बेकायदेशीर दारु असा एकूण ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे़
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील गल्ली क्रमांक १ लालबहादूर शास्त्री नगर येथील एका झोपडी वजा पडीत असलेल्या घरात देशी-विदेशी दारु असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली़ माहिती मिळताच पथकाने त्या झोपडीवजा घरात गुरुवारी छापा टाकला़ या ठिकाणी बेकायदेशीर देशी आणि विदेशी दारु बनविण्याचे साहित्यांमध्ये लोखंडी सिलींग मशिन, हॅण्डमेड, स्पिरीटने भरलेले प्लॅस्टिकचे ड्रम, इतर बनावट मद्य बनविण्याकरीता लागणारे साहित्य असा एकूण ५३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ घटनास्थळी अजय विश्वास पावरा (२२, रा़ बोराडी, ता़शिरपूर) याला संशयावरुन अटक करण्यात आली आहे़ ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालक प्राजक्ता लवंगारे - वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या नेतृत्वाखाली आय़ एऩ वाघ, एस़ आऱ नजन, व्ही़ बी़ पवार, सूर्यवंशी, बी़ एस़ महाडीक, डी़ के़ क्षिरसागर, के़ एऩ गायकवाड, एऩ एम़ सोनवणे, आऱ जे़ जाधव, एम़ पी़ पवार, ए़ बी़ निकुंभे, गोयेकर, जवान अमोद भडागे, के़ एम़ गोसावी, प्रशांत बोरसे, जी़ व्ही़ पाटील, केतन जाधव, कपिल ठाकूर, किरण वराडे, जे़ बी़ फुलपगारे, के़ ए़ नागरे, आऱ बी़ शेडगे, विजय नाहीदे, निलेश मोरे, आऱ एम़ देसले, आऱ बी़ चौरे यांनी कारवाई केली़ एस़ आऱ नजन घटनेचा तपास करीत आहेत़