मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:27 PM2019-03-18T22:27:28+5:302019-03-18T22:28:20+5:30

दोंडाईचा : संशयितांकडून ६२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत, एक फरार

Both arrested and arrested for mobile theft | मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक

dhule

Next

दोंडाईचा : बसस्थानकासमोरील दुकान फोडून १ लाख ३४ हजाराचे मोबाईल लांबविल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. या संशयितांकडून ६२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दोंडाईचा- येथील बसस्थानक समोरील तखतमल मार्केटमधील गुरुकृपा मोबाईल दुकानाचे शटर उचकवून चोरट्यांनी १ लाख ३४ हजार ५५७ रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल हॅण्डसेट लांबविले होते. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात ४५७, ३८०, ४२७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी, पोलीस उपनिरीक्षक हर्षा जाधव, चंद्रकांत साळुंखे, पो.कॉ. संदीप कदम, मुकेश आहिरे, तारकेश चंद्रात्रे, अश्विनी कुमावत, वर्षा गोपाळ, होमगार्ड अनिल ईशी यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरुन २ संशयितांना ताब्यात घेतले असता, साजन भील, पवन सोनवणे, मन्या उर्फ मनीष भील यांनी चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित साजन भील व पवन सोनवणे यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी पवन सोनवणे याच्या घरात ठेवलेले ६१ हजार ९२५ रुपये किंमतीचे मोबाईल हॅण्डसेट हस्तगत केले. दरम्यान, आरोपी मन्या भील अद्याप फरार आहे.
दरम्यान, शनिवारी दोघा संशयितांना दोंडाईचा न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत देण्यात आली. मंगळवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: Both arrested and arrested for mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे