अपघातात दोघे जीवलग मित्र ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:18 PM2018-12-14T22:18:32+5:302018-12-14T22:19:03+5:30
शिरपूर : भावेर येथील रहिवाशी, खाजगी कामासाठी धुळ्याला गेले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील कुरखळी फाट्यानजिक रस्ता ओलांडत असतांना एका भरधाव वेगाने येणाºया कारने दुचाकी गाडीला जोराने धडक दिल्याने तालुक्यातील भावेर येथील दोघे जीवलग मित्रांचा अपघातात जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली़
ही घटना शुक्रवार १४ रोजी संध्याकाळी ५़३० ते ६ वाजेच्या सुमारास कुरखळी फाट्यानजिक असलेली हॉटेल स्वागत समोर घडली़
शिरपूर तालुक्यातील भावेर येथील संजय भिका धनगर (४५) व राजेंद्र चुनिलाल धनगर (४७) हे दोघे जीवलग मित्र असल्यामुळे खाजगी कामासाठी ते धुळ्याला गेले होते़ काम आटोपून ते गावाकडे परत येत असतांना मार्गावरील कुरखळी फाट्यानजिक असलेली हॉटेल स्वागत त्यांचे आप्तजण मोहन धनगर यांनी चालविण्यासाठी घेतल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ते गेले होते़ मात्र हॉटेल चालकांनी त्यांना जेवणाचा आग्रह केल्यानंतर तेथून जेवन करून बाहेर निघाल्यानंतर रस्ता ओलांडत असतांना धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाºया एका कारने दुचाकी गाडीला जब्बर धडक दिली़ धडक एवढी जब्बरदस्त होती की दुचाकी गाडीवरील दोघे स्वारांचा जागीच मृत्यु झाला़
घटनेचे वृत्त कळताच आमदार अमरिशभाई पटेल यांचे स्वीय सचिव अशोक कलाल, मार्केट कमिटी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, नगरसेवक चंदनसिंग राजपूत, भाजपाचे शहराध्यक्ष हेमंत पाटील, हेमराज राजपूत, भावेरचे सरपंच लहु गुजर, अॅडग़ोपालसिंग राजपूत, कल्याणसिंग राजपूत, रामचंद्र ठाकरे, हिंमतराव धनगर, अरमान पटेल, महेमुद पटेल, पिंप्रीचे संजय धनगर आदींनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली़
मयत संजय धनगर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, मुलगी असा परिवार आहे तर राजेंद्र धनगर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे़ दोघांची अंत्ययात्रा आज १५ रोजी सकाळी १० वाजता काढली जाणार आहे़ दरम्यान या घटनेची माहीती कळताच गावात शोककळा पसरली होती़