वाळू चोरीप्रकरणी दोघांना एक वर्षाची शिक्षा
By Admin | Published: July 4, 2017 11:49 AM2017-07-04T11:49:20+5:302017-07-04T11:49:20+5:30
कंचनपूर शिवारात पांझरा नदीपात्रातून विनापरवानगी वाळू वाहतूक करताना आढळलेल्या ट्रॅक्टरमालक व चालक या दोघांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़
ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा, दि.4 - तालुक्यातील कंचनपूर शिवारात पांझरा नदीपात्रातून विनापरवानगी वाळू वाहतूक करताना आढळलेल्या ट्रॅक्टरमालक व चालक या दोघांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा शिंदखेडय़ाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रीतेशकुमार भंडारी यांनी ठोठावली़
सोनू उर्फ योगेश आसाराम पाटील (26, चालक) आणि अविनाश मगन पाटील (30, ट्रॅक्टरमालक) (दोन्ही रा़ कंचनपूर, ता़ शिंदखेडा) अशी शिक्षा ठोठावलेल्यांची नावे आहेत.
15 सप्टेंबर 2014 रोजी दुपारी पांझरा नदीपात्रात त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर एमएच 18-एन 9273 व ट्रॉली क्रमांक एमएच 18-एन 9274 यामध्ये ेशासकीय परवाना न घेता ते नदीपात्रातील वाळू चोरून नेताना आढळून आले होत़े
त्यांच्याविरुद्ध किरण काशिनाथ कोठावदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आऱ एस़ बन्सी, वासुदेव जगदाळे, दीपक विसपुते यांनी केला़