कर थकबाकी वसुलीसाठी 90 नळ कनेक्शन खंडित!
By admin | Published: March 17, 2017 12:07 AM2017-03-17T00:07:27+5:302017-03-17T00:07:27+5:30
महापालिका : पथकांकडून दिवसभरात 21 लाखांची करवसुली, तीन मालमत्ता ‘सील’
धुळे : महापालिका प्रशासनाने 31 मार्चर्पयत थकबाकी व नियमित कर वसुलीची विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आह़े या मोहिमेंतर्गत गुरुवारी पथकांकडून 21 लाखांची करवसुली करण्यात आली़ तर पाणीपट्टीपोटी 6 लाख वसूल करण्यात आल़े तीन मालमत्ता ‘सील’ केल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़
महापालिकेने शास्ती माफीनंतर करवसुलीची धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर केले होत़े त्यानुसार शास्ती माफीतील 25 टक्के सवलतीची मुदत 20 मार्चला संपुष्टात येत आह़े मात्र नगरविकास विभागाने करवसुलीवर भर देण्याचे आदेश काढल्याने मनपा प्रशासनाने तत्काळ धडक मोहीम सुरू केली असून त्यासाठी सात पथके नेमण्यात आली आहेत़ सदर पथकांनी गुरुवारी दिवसभरात तीन मालमत्ता सील करीत 21 लाख 4 हजार 49 रुपयांचा कर वसूल केला़ मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत असलेल्या 90 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आल़े वडजाई रोडवर सदरची कारवाई करण्यात आली़ मनपातील भरण्यासह दिवसभरात 30 लाख रुपयांची करवसुली करण्यात आली़ मालमत्ताधारकांकडून केवळ मालमत्ता करच नव्हे तर विकास शुल्क, एलबीटी, पाणीपट्टी व थकीत असलेले अनुषंगिक कर वसूल केले जात आह़े बुधवारी दिवसभरात 13 लाख रुपयांची करवसुली झाली होती़ मनपातील वरिष्ठ अधिका:यांचा पथकात समावेश असल्याने मनपातील कामे मात्र खोळंबत असली तरी 31 जानेवारीर्पयत मोहीम सुरू राहणार आह़े पथकप्रमुखांमध्ये सहायक आयुक्त अभिजित कदम, आरोग्याधिकारी डॉ़महेश मोरे, प्ऱनगररचनाकार प्रदीप चव्हाण, शहर अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, सी़सी़ बागुल व सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांचा समावेश आह़े
थकबाकीदार अस़े़़
5 ते 50 हजार- 2703
50 हजार ते 1 लाख- 507
1 लाख ते 2 लाख- 155
2 लाख ते 5 लाख- 42
5 लाख ते 10 लाख- 20
10 लाखांपेक्षा अधिक- 7
एकूण 9 कोटी 13 लाख 45 हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत आह़े सदर आकडेवारी मनपाने प्रथमच जाहीर केली आह़े