रस्त्याच्या कामांना अतिक्रमणांचा ‘ब्रेक’!
By admin | Published: March 13, 2016 12:06 AM2016-03-13T00:06:00+5:302016-03-13T00:06:00+5:30
16 रस्त्यांपैकी आतार्पयत केवळ सात रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत़
धुळे : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील 16 रस्त्यांच्या कामांसाठी 43 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आह़े दरम्यान या कामांची निविदा प्रक्रिया राबवून दोन महिने झाल्यानंतर देखील कामांना अजून सुरुवात झालेली नाही़ 16 रस्त्यांपैकी आतार्पयत केवळ सात रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत़ अतिक्रमणासह वेगवेगळी कारणे देऊन आतार्पयत या कामात टाळाटाळ झाली असली तरी अर्थकारणाचाच प्रमुख अडसर असल्याचे दिसून येत आह़े महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत महापालिकेस 16 डीपी रस्त्यांसाठी 43 कोटी 72 लाख 34 हजार 964 रुपयांचा निधी प्राप्त झाला आह़े सदर रस्त्यांची सद्य:स्थिीतील अवस्था व वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन निवड करण्यात आली आह़े मात्र कामाचे कार्यादेश देऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही़ नगरोत्थान योजनेतही पहिल्यापासूनच वादविवाद उद्भवले आहेत़ शंभर फुटी रस्त्याच्या निविदा प्रक्रियेचा वाद न्यायालयात प्रलंबित आह़े तर अन्य दोन रस्त्यांसाठी फेरनिविदा काढली जाणार असल्याचे सांगण्यात आल़े अतिक्रमणांचा अडथळा सदर रस्त्यांवर असलेले अतिक्रमण हटविण्याबाबत मनपा प्रशासनाने अनेकदा बैठका घेतल्या आहेत़ सर्व रस्त्यांचे सव्रेक्षण करून अतिक्रमण मोहिमेचा आराखडा तयार देखील करण्यात आला़ परंतु प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्याच्या वेळी रस्त्यांची रुंदी अतिक्रमणांमुळे कमी झाल्याचे दिसून आल्याने प्लेन टेबल सव्रेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े परंतु या सव्रेक्षणासाठी निविदा काढायची की एखाद्या खासगी संस्थेची मदत घ्यायची, याबाबत विचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी सांगितल़े सर्व रस्त्यांवर अतिक्रमण असून काही रस्त्यांवरील अतिक्रमण आतार्पयत काढण्यात आले आह़े जे अतिक्रमण काढण्यात आले आहे, त्या रस्त्यांच्या कामांना तरी सुरुवात करणे आवश्यक आह़े परंतु ठेकेदारांची अनुत्सुकता दिसून येत आह़े अर्थकारणाचा अडसर मुळात या योजनेच्या निविदा भरण्यापासूनच योजनेत मोठे अर्थकारण होत असल्याची चर्चा मनपा आवारात रंगत आह़े एवढेच नव्हे तर काही नगरसेवकांसह पदाधिकारी बिनधास्तपणे टक्केवारीची चर्चा करीत असल्याचेही यापूर्वी दिसून आले आह़े त्यामुळे ठेकेदारही हैराण झाले असल्याने ते कामे सुरू करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आह़े दोन वेळा नोटिसा देऊनही ठेकेदारांनी मनपाशी कामांचा करार करण्याबाबत टाळाटाळ केली होती़ त्यानंतरही आतार्पयत केवळ सात कार्यादेश देण्यात आले आहेत़ दरम्यान प्रस्तावित 16 रस्त्यांपैकी एका रस्त्यावर फक्त एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत़ मात्र मनपा प्रशासनाकडून शहरातील सर्व एलईडी पथदिवे बदलण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याने योजनेंतर्गत होणारे एलईडीचे काम थांबविले जाणार आह़े