लाचप्रकरणी धुळ्य़ातील अधिका:याविरुद्ध गुन्हा

By admin | Published: July 8, 2017 05:08 PM2017-07-08T17:08:29+5:302017-07-08T17:08:29+5:30

माळी यांनी नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना दीड लाखांची लाच देवू केली होती़

Bribery Officer: Crime against | लाचप्रकरणी धुळ्य़ातील अधिका:याविरुद्ध गुन्हा

लाचप्रकरणी धुळ्य़ातील अधिका:याविरुद्ध गुन्हा

Next

 ऑनलाईन लोकमत

 
धुळे, दि.8 - जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांच्यावर लाचखोरी प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात 8 रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े माळी यांनी नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांना दीड लाखांची लाच देवू केली होती़ 
पंचायत राज समितीचा तीन दिवसांचा दौरा जिल्ह्यात सुरू होता़ गुरुवारी या समितीच्या पथकाने धुळे तालुक्यातील कापडणे गावात प्रत्यक्ष जावून पाहणी केली होती़ या पाहणीत शालेय पोषण आहारासह कागदोपत्री ब:याच त्रुटी आढळल्या होत्या़ हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर विधीमंडळात यावर बोलू नये यासाठी तुषार माळी यांनी आमदार हेमंत पाटील यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती़ या भेटीत काही संशयास्पद असू शकते, असा संशय आल्याने आमदार हेमंत पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी सकाळीच तक्रार केली होती़ 
शुक्रवारी सायंकाळी मालेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये आमदार आणि माळी यांची भेट झाली़ त्या भेटीत दीड लाख रुपये देताना माळी यांना अटक करण्यात आली होती़ 
याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार 8 रोजी मध्यरात्री 1.16 वाजता आमदार हेमंत पाटील यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार 1988 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आह़े 

Web Title: Bribery Officer: Crime against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.