पुलावरील मार्ग पादचाºयांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:33 PM2019-07-19T23:33:07+5:302019-07-19T23:37:43+5:30
पिंपळनेर : पोलिसांनी आश्वासन पाळल्याने समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंंपळनेर : येथील मांजरा नदीवर नवीन बांधलेल्या पुलावर आठवडे बाजारा दिवशी दुकाने मांडणाºया व्यावसायिकांना हटवून पादचाºयांंसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी या संदर्भात कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
येथील पोलीस ठाण्यातर्फे नुकत्याच आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी गावातील काही समस्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांना सांगून तत्काळ कारवाईची मागणी केली होती. त्या संदर्भात प्राप्त सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन राठोड यांनी त्या बैठकीत दिले होते.
मिळालेल्या सूचनांची छाननी करून पोलिसांनी त्यावर काम सुरू केले आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी आठवडे बाजाराच्या दिवशी शुक्रवारी पहावयास मिळाली. गावात मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. वाहतुकीची समस्या सुटावी यासाठी पांझरा नदीवरील जुन्या पुलालगत नवा मोठा पूल बांधण्यात आला आहे. पुलाच्या पश्चिमेला दीड मीटरचे पादचारी मार्ग (फुटपाथ) ये-जा करण्यासाठी बनविण्यात आलेले आहेत. पण आठवडे बाजाराच्या दिवशी कटलरी व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक या पादचारी मार्गांवर सर्रासपणे दुकाने मांडतात. यामुळे वयोवृद्ध महिला-पुरुष तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना नाईलाजाने पुलावरून चालत जावे लागते. मात्र पुलावरून जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नेहमीच अपघाताचा धोका असतो. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती कायम आहे. त्यावरूनच शांतता कमिटीच्या बैठकीत नागरिकांकडून काही सूचना पोलीस ठाण्यास देण्यात आल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी यासंदर्भात आज आपल्या पथकासह कारवाई करत व्यावसायिकांना उठवून लावली. पुन्हा ते येऊ नयेत यासाठी दिवसभर याठिकाणी पोलीस तसेच त्यांची वाहने तैनात करण्यात आली होती. पादचारी मार्ग खुला असल्याने त्यावरून ये-जा करणाºया नागरिकांनी पोलिसांच्या कारवाई संदर्भात समाधान व्यक्त केले आहे. तसेच यापुढेही हा मार्ग कायमस्वरूपी खुला राहावा यासाठी पिंपळनेर व सामोडे ग्रा.पं.नी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त झाली.