बहिणीच्या घरासमोरच भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Published: February 9, 2017 12:37 AM2017-02-09T00:37:39+5:302017-02-09T00:37:39+5:30

अकुलखेडा येथील घटना : थाळनेर येथील व्यक्तीचा मृत्यू

Brother's accident in front of his sister; Death during treatment | बहिणीच्या घरासमोरच भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

बहिणीच्या घरासमोरच भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

Next

शिरपूर :       अकुलखेडा गावाजवळ एस.टी. बसने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या थाळनेर येथील  नितीन जगन्नाथ साळुंखे (39) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू ओढवला.
दुर्दैवाची गोष्ट ही की,  हा अपघात नेमका नितीनच्या बहिणीच्या घरासमोरच घडला़
 नितीन  दोन दिवसांपूर्वी अकुलखेडा येथील बहीण भारती सुनील बडगुजर यांच्याकडे आणि तेथून काही कामानिमित्त ते सोमवारी चोपडा येथे गेले होते.
चोपडय़ाहून  मोटारसायकलने (एम़एच़19-एक्यू-1431) परत येताना अकुलखेडा येथे बहिणीच्या घराच्या समोरच शिरपूर आगाराच्या बसने (एम़एच़40-एन-9028) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
 भारती यांनी शर्टावरून भावाला ओळखले. त्यानंतर लगेचच नितीन यांना उपचारासाठी चोपडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.  तेथून अधिक उपचारासाठी त्यांना नेत असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Brother's accident in front of his sister; Death during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.