धुळे महापालिकेचा २५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:42 PM2018-03-21T16:42:35+5:302018-03-21T16:42:35+5:30
स्थायी समितीची सभा, विकासासाठी तरतुद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्थायी समितीच्या सभेत बुधवारी सुधारीत व मुळ अर्थसंकल्प आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समिती सभापती वालिबेन मंडोरे यांना सादर केला़ २५४ कोटींच्या या अर्थसंकल्पात कर्मचाºयांवर मेहेरनजर ठेवत तब्बल ५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून ई-गर्व्हनन्स, जीआयएस मॅपिंग, प्रलंबित देयकांसाठीही तरतुद केल्याचे आयुक्त म्हणाले़
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी झाली़ या सभेत आयुक्तांनी २५४ कोटी ९७ लाख ६४ हजार रूपयांचे सन २०१७-१८ चे सुधारीत व २०१८-१९ चे मुळ अंदाजपत्रक सभापती वालिबेन मंडोरे यांना सादर केले़ त्यानंतर आयुक्तांनी अंदाजपत्रकातील तरतुदींविषयी सविस्तर विवेचन केले़ आयुक्त म्हणाले की, गेल्या तीन वर्षांचे अंदाजपत्रक पाहता तरतुदींचे आकडे फुगविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात महसुली उत्पन्न व खर्च हा प्रशासकीय तरतुदींच्या जवळपासच आहे़ त्यामुळे आकडेवारीत अवास्तव वाढ न करता वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला आहे़ या अंदाजपत्रकात विकासासाठी तरतुद करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे़