धुळ्यात घरफोडी,५० हजारा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:58 AM2020-01-23T11:58:11+5:302020-01-23T11:58:30+5:30

आझादनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

 Burglary in the dust, 3 thousand instead of lump | धुळ्यात घरफोडी,५० हजारा ऐवज लंपास

धुळ्यात घरफोडी,५० हजारा ऐवज लंपास

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे :शहरातील साक्रीरोडवर असलेल्या शीतल कॉलनीत बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी दागिन्यांसह सुमारे ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या मागे असलेल्या शीतल कॉलनीतयाठिकाणी अरुणाबाई हरी हिवरकर हे राहतात. त्यांच्या घरात सरस्वती उर्फ सुनीता रामभाऊ पाटील (वय ४५) या भाडेतत्वावर राहतात. घरमालक हिवरकर या चोपडा येथे गेल्या होत्या. तर पाटील व त्यांचा मुलगा हरीष हे दोघे देवपुरातील आधारनगरात राहणारे नातलगांच्या घरी गेले होते.
हिच संधी चोरट्यांनी साधत बंद घरात त्यांनी प्रवेश केला. यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेली रोकड व दागिने लांबवण्यात आले. चोरट्यांनी हिवरकर यांच्या घरात हातसाफ केल्यानंतर पाटील यांचे घरातही चोरी केली. चोरट्यांनी एकूण ४९ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला.यात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम याचा समावेश आहे. याप्रकरणी सुनीता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title:  Burglary in the dust, 3 thousand instead of lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.