किरवाडे येथे घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास
By अतुल जोशी | Published: January 24, 2024 07:28 PM2024-01-24T19:28:52+5:302024-01-24T19:29:05+5:30
दोन्ही घरांतील एकूण १ लाख २६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
धुळे : साक्री तालुक्यातील किरवाडे गावात दोघा भावांच्या घरी चोरट्याने घरफोडी करून घरातील १ लाख २६ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २० जानेवारी सायंकाळी ६ ते २१ जानेवारी रोजीच्या सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी साक्री पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश गुलाबराव पाटील (रा. किरवाडे) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. या घरफोडीत घरातील ३४ हजार रुपयांची रोकड, १२ हजार रुपयांची माळ, १८०० रुपयांचे चांदीचे दागिने, तसेच भाऊ नरेंद्र पाटील यांच्या घरातील २० हजार रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने, असा मिळून ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दोन्ही घरांतील एकूण १ लाख २६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी साक्री पोलिस स्टेशनला ज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक पी. डी. रौंदळ करीत आहेत.