पिंपळनेरात दोन ठिकाणी घरफोडी, हजारो रूपयांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:48 PM2020-09-22T12:48:18+5:302020-09-22T12:48:31+5:30

दोन्ही घरमालक बाहेरगावी , पोलीस स्टेशनला अद्याप गुन्हा दाखल नाही

Burglary at two places in Pimpalner, Lampas looted thousands of rupees | पिंपळनेरात दोन ठिकाणी घरफोडी, हजारो रूपयांचा ऐवज लंपास

पिंपळनेरात दोन ठिकाणी घरफोडी, हजारो रूपयांचा ऐवज लंपास

Next

आॅनलाइन लोकमत
पिंपळनेर (जि.धुळे)- येथील सटाणा रोडवरील एन. के. पाटील नगरात मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. चोरट्यांनी घरातून सोनसाखळी, अंगठी, चांदीचे दागिने आणि एलईडी टीव्ही संच लंपास केल्याची माहिती या कॉलनीतील रहिवाशांकडून मिळाली आहे. दरम्यान घरमालक बाहेरगावी गेले असल्याने नेमके कितीचा मुद्देमाल गेला हे समजू शकलेले नाही. तसेच गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही.
प्राध्यापक मधुकर भटू एखंडे यांचा काही महिन्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी बाहेर गावी गेल्या आहेत. प्रा.एखंडे यांच्या घराला दोन-तीन दिवसापासून कुलूप होते. याचा चोरांनी फायदा घेत घराच्या प्रवेश द्वाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. व कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तेथे काहीच मिळाले नाही. त्यानंतर चोरांनी आपला मोर्चा दुसऱ्या घराकडे वळविला. याच कॉलनीतील विद्युत महामंडळातील निवृत्त अधिकारी व्ही. एन. नंदन यांच्या घरातील प्रवेश द्वाराला असलेल्या गेटचा कडीकोंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. चोरांनी घरातील कपाटी मधील सामान अस्ताव्यस्त करून त्यातून सोनसाखळी, अंगठी, चांदीचे दागिने तसेच एलईडी टीव्ही संच चोरांनी लंपास करून नेल्याची प्राथमिक माहिती येथील रहिवाशांकडून मिळाली. दोन्हीही घर मालक बाहेरगावी असल्याकारणाने घरातील आणखी कायकाय साहित्य चोरीस गेले हे समजू शकले नाही. घरमालक आल्यानंतर याचा उलगडा होईल.
जवळच राहत असलेले धनंजय पाटील यांनी पोलिसात फोन लावून माहिती दिली. या ठिकाणी पोलिसांनी येऊन पहाणी केली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.

Web Title: Burglary at two places in Pimpalner, Lampas looted thousands of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.