धुळ्यात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:39 PM2019-02-15T12:39:14+5:302019-02-15T12:40:46+5:30

हल्याचा केला निषेध, शिवसेनेतर्फे हाफिज सईदच्या पुतळ्याला दिली फाशी

The burning of Pakistani statue by Dharni Nadiadhi Vidadi Vidyarthi Congress | धुळ्यात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन

धुळ्यात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन

Next
ठळक मुद्देराष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसने दिल्या पाकिस्तानविरोधी घोषणामहाराणा प्रताप चौकात केले पुतळ्याचे दहन

आॅनलाइन लोकमत
धुळे-जम्मु-काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्याचा राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. तसेच शहरातील महाराणा प्रताप चौकात पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शिवसेनेतर्फे जैश -ए-मोहंमद बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्या प्रतिमेला फासावर लटकवले.
जम्मूहून काश्मिरला जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरूवारी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. या हल्यात ४२ जवान शहीद झाले. देशात सुरक्षा जवानांवर झालेला आतापर्यंतच सर्वात मोठा हल्ला असून, या हल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. मागील पाच वर्षात दहशतवाद्यांचे अनेक मोठे हल्ले देशावर झाले आहेत. हे सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न राष्टÑवादीने उपस्थित केला आहे. या हल्याच्या निषेधार्थ राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
तर शिवसेनेने जिल्हा कार्यालयाबाहेर जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या पुतळ्याला फाशी दिली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: The burning of Pakistani statue by Dharni Nadiadhi Vidadi Vidyarthi Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे