केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 08:11 PM2020-09-17T20:11:04+5:302020-09-17T20:11:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिंदखेडा : केंद्र सरकारने कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीच्या विरोधात तालुका शिवसेनेच्यावतीने केंद्र शासनाचा निषेध केला. कांदा ...

Burning of the statue of the Central Government | केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : केंद्र सरकारने कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीच्या विरोधात तालुका शिवसेनेच्यावतीने केंद्र शासनाचा निषेध केला. कांदा निर्यात बंदीची केलेली घोषणा तात्काळ अशी मागणी केली. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करुन येथील छत्रपती शिवाजी चौकात मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदा निर्यात बंदीची घोषणा केली आहे. सदरचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. यंदाच्या परिस्थितीत कांद्याला कुठेतरी भाव मिळत असतांना अचानक केद्र शासनाने कांदा निर्यात बंदीची घोषणा करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. केद्र शासनाने कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी, अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, कृ.उ.बा.समिती संचालक सजेर्राव पाटील, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, तालुका संघटक डॉ. मनोज पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, शिंदखेडा शहरप्रमुख सागर देसले, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, हिरालाल बोरसे, युवासेनेचे गणेश परदेशी, प्रदीप पवार, दोंडाईचा शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, उपशहरप्रमुख दिपक मराठे, हातनूरचे उपसरपंच दिपक जगताप, पं.सं.सदस्य भगवान पिंपळे, संजय देसले, मनोज पवार, अशोक मराठे, प्रशांत जगताप, संदीप पाटील, संतोष माळी, एस.टी.कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष आर.आर.पाटील, शरद बेहरे, साहेबराव पाटील, रविंद्र धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Burning of the statue of the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.