बस-आयशर अपघात एक ठार, २३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:42 PM2018-05-10T22:42:35+5:302018-05-10T22:42:35+5:30
जुनवणेजवळील घटना : जखमींवर उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
विंचूर : चाळीसगाव रोडवर तालुक्यातील जुनवणे गावाजवळ आयशर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला़ ही घटना गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली़ यात १ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत़
धुळ्याकडून औरंगाबादकडे जाणारी औरंगाबाद डेपोची (एमएच २० बीएल ४०५७) बस धुळे तालुक्यातील जुनवणे गावाजवळ आल्यानंतर चाळीसगावकडून इंदौरकडे जाणारी आयशर गाडी यांच्यात समोरासमोर अपघात झाला़ या अपघातात बसमधील प्रवासी सिंकदर पिरन पिंजारी (६०, रा़ बहाळ ता़ चाळीसगाव) हे सुमारे २० फुट फेकले गेल्याने जबर जखमी झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू ओढवला़ तर अपघातातील जखमींमध्ये चालक जगन्नाथ एकनाथ आगळे, रावजी ज्योतीराम बोरसे, मनिषा सुधाकर वाघ, सुरेखा प्रमोदराव नवगिरे, सुमनबाई गोकूळ घोडे, योगेश केवळ मोरे, पंकज उत्तमराव मराठे, तुकाराम धनराज शिरसाठ, वैष्णवी नरेंद्र देसले, किर्ती नरेंद्र देसले आणि अन्य असे एकूण २३ जण जखमी झाले़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
अधिकाºयांची भेट
जुनवणे शिवारात झालेल्या अपघाताच्या ठिकाणी धुळे आगाराचे व्यवस्थापक भगवान जगनोर आपल्या सहकाºयांसमवेत तातडीने दाखल झाले़ त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बसमधील जखमींना मदत केली़ घटनास्थळी पोलीसही दाखल झाले़ त्यांनी पंचनामा केला़
तातडीची आर्थिक मदत
अपघातात मयत झालेल्या पिंजारी यांच्या वारसांना १० हजार रुपये तर सर्व जखमींना प्रत्येकी १ हजार रुपये राज्य परिवहन महामंडळामार्फत देण्यात आले़ यावेळी नातलग उपस्थित होते़