अजंगजवळ बस - कारचा अपघात, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:18 AM2018-08-28T11:18:06+5:302018-08-28T11:22:59+5:30

नागपूर-सुरत महामार्ग : वाहतुकीची कोंडी, गतिरोधकाची मागणी

Bus near Ajang - car accident, driver killed | अजंगजवळ बस - कारचा अपघात, चालक ठार

अजंगजवळ बस - कारचा अपघात, चालक ठार

Next
ठळक मुद्देअजंग शिवारात कार आणि बसचा अपघात कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील अजंग शिवारात धुळे जिल्हा माहिती कार्यालयाची कार आणि महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला़ यात कार चालक रावण मोरे गंभीर जखमी झाले़ त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ 
जळगावकडे जाणारी एमएच २० बीएल ४१८४ क्रमांकाची बस आणि धुळ्याकडे येणारी जिल्हा माहिती कार्यालयाची एमएच ४३ जी ४३६ क्रमांकाची कार यांच्यात सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील अजंग शिवारात समोरा-समोर अपघात झाला़ या अपघातात चालक मोरे यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले़ घटनास्थळी गावकºयांनी गतिरोधकाची मागणी केल्याने बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती़ तसेच कार आणि बसचे देखील नुकसान झाले आहे़ 
दरम्यान, जळगाव जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रभारी धुळे जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांना जळगाव येथे सोडल्यानंतर कार चालक रावण मोरे हे धुळ्याकडे येत होते, असे सुत्रांकडून सांगण्यात आले़ 

Web Title: Bus near Ajang - car accident, driver killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.