54 हजार 709 क्विंटल तूर खरेदी
By admin | Published: April 19, 2017 04:07 PM2017-04-19T16:07:00+5:302017-04-19T16:07:00+5:30
धुळे व नंदुरबार या दोन जिल्ह्यातील एकूण चार केंद्रांवर आतार्पयत एकूण 54 हजार 709 क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.
Next
धुळे, दि.19- धुळे व नंदुरबार या दोन जिल्ह्यातील एकूण चार केंद्रांवर आतार्पयत एकूण 54 हजार 709 क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. 22 एप्रिलर्पयतच खरेदी सुरू राहणार आहे. त्यानंतर या केंद्रांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डिसेंबर महिन्यात नाफेडमार्फत ही तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यात धुळे व शिरपूर येथे तर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर व शहादा येथे अशी एकूण पाच केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु नवापूर केंद्रावर तुरीची आवक होत नसल्याचे लक्षात येताच तेथील केंद्र तत्काळ बंद करण्यात आले होते. मात्र अन्य चार केंद्रे अखेर्पयत सुरूच राहिली.
बारदानाअभावी खोळंबा
दरम्यान बारदान संपल्याने या चारही केंद्रांवर तूर खरेदी बंद राहिल्याने शेतक:यांना बरेच दिवस खोळंबा सहन करावा लागला. अखेर बारदान प्राप्त होताच पुन्हा खरेदी सुरू झाली. खरेदी केंद्रांना प्रथम 31 मार्चर्पयत, त्यानंतर बारदानअभावी खरेदी होऊ न शकल्याने 15 एप्रिलर्पयत व तिस:यांदा 22 एप्रिलर्पयत मुदतवाढ देण्यात आली.
तिस:यांदा मिळालेली मुदतवाढ संपण्यास अद्याप तीन दिवस शिल्लक असून शेतकरी तूर खरेदीसाठी आणत आहेत. खरेदी केंद्रांचे नियंत्रण जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयामार्फत होत आहे.
धुळे जिल्ह्यातील धुळे बाजार समितीत असलेल्या खरेदी केंद्रावर 14 हजार 3 क्विंटल, शिरपूर बाजार समितीतील दुस:या केंद्रावर 13 हजार 841 अशी एकूण 27 हजार 844 क्विंटल तुरीची खरेदी झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार येथील खरेदी केंद्रावर 7 हजार 844 क्विंटल तर शहादा येथील केंद्रावर 19 हजार 20 अशी एकूण 26 हजार 864 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
सध्या बारदान उपलब्ध असल्याने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत तूर खरेदी सुरू आहे. 23 रोजी रविवार असल्याने 22 रोजी संध्याकाळी पंचनामा करण्यात येऊन शेतक:यांनी तूर विक्री न झाल्यास त्यांना दुस:या दिवशी तूर खरेदीसाठी बोलविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.