धुळ्यात पहिल्या दिवशी पाचशे क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:53 PM2020-05-12T21:53:54+5:302020-05-12T21:54:15+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती : जवाहर सुतगिरणी कापूस खरेदी सुरू, कापसाला मिळाला पाच हजार ३५५ रुपये भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे मोराणे येथील जवाहर सुतगिरणीत कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्याने ऐन खरीप हंगामाच्या तयारीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़
पहिल्याच दिवशी पाचशे क्विंटल कापूस खरेदी झाली़ कापसाला पाच हजार ३५५ रुपये भाव मिळाल्याने लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर झाली असून आता खरीप हंमागाच्या तयारीला वेग येणार आहे़
ओला दुष्काळ आणि कोरोनाच्या आजारामुळे जाहिर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतकरी संकटात सापडले होते़ प्रत्येक शेतकºयांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून होता़ त्यामुळे शासनाकडे प्रयत्न करुन जवाहर सुतगिरणीमध्ये कापूस केंद्र सुरु करुन घेतले, अशी माहिती धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दिली़
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जवाहर सुतगिरणीमध्ये मंगळवारपासुन कापूस खरेदीला प्रारंभ झाला़ आमदार पाटील यांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करुन खरेदी सुरु केली़
यावेळी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, सुतगिरणीचे व्हा़ चेअरमन प्रमोद जैन, बाजार समितीचे उपसभापती रितेश पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ़ दरबारसिंग गिरासे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल पाटील, कार्यकारी संचालक अशोक नन्ना, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, आप्पा खताळ, अशोक सुडके, किर्तीमंत कौठळकर, बापू नेरकर, बापू खैरनार, शांताराम लाठर, एस़ एम़ पाटील, सहकार अधिकारी राजेंद्र विरकर, विजय भडागे, कामगार अधिकारी नवल पदमर, रामेश्वर महाजन, अमोल एंडाईत आदी उपस्थित होते़
दरम्यान, सदर केंद्रावर कापूस विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीने उपलब्ध करुन दिली होती़ कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कापूस खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्याचे नियोजन आहे़ त्यासाठी नोंदणी केलेल्या पहिल्या वीस शेतकºयांना धुळे बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे यांच्या हस्ते कापूस खरेदीचे टोकण वाटप करण्यात आले़
यावेळी उप सभापती रितेश पाटील, संचालक किर्तीमंत कौठळकर, विजय चिंचोले, गंगाराम कोळेकर, कापूस उत्पादक पणन महासंघाचे एस़ एम़ पाटील, बाजार समितीचे प्रभारी सचिव दिनकर बारकू पाटील यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते़ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले़
कापूस विक्रीसाठी वीस शेतकºयांनी आॅनलाईन संकेतस्थळावर नोंदणी केली होती़ त्यानुसार या शेतकºयांना कापूस विक्रीसाठी बोलावण्यात आले होते़ त्यापैकी पंधरा शेतकºयांनी पाचशे क्विंटल कापूस मंगळवारी विक्री केला़ वाहने उपलब्ध न झाल्याने पाच शेतकरी येवू शकले नाहीत़ या शेतकºयांचे सोयीनुसार नियोजन करण्यात येणार आहे़ बुधवारसाठी वीस शेतकºयांना टोकन दिले जाणार आहे़ या शेतकºयांना बोलावण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली़