सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:33 PM2019-12-23T22:33:28+5:302019-12-23T22:33:50+5:30

समाजवादी पार्टी : धरणे आंदोलनानंतर प्रशासनाला दिले निवेदन

Cancel the updated Citizenship Act | सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करा

सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करा

Next

धुळे : सुधारीत नागरीकत्व कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी समाजवादी पार्टीच्यावतीने क्युमाईन क्लब जवळ धरणे आंदोलन करण्यात आले़ यानंतर अमिन पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले़
हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे़ त्यामुळे या कायद्याला आम्ही विरोध नोंदवितो़ या कायद्याला त्वरीत रद्द करण्यात यावे़ हा कायदा देशाला घातक आहे़ सरकारकडून मागील दहा वर्षात व्यक्तीचे आधारकार्ड देखील बनविता आलेले नाही़ या अनुषंगाने सारे कागदपत्र जमा करुन व्यक्तीचे नागरीकत्वाचा निर्णय कसे करु शकेल, हा प्रश्नच आहे़ आजही ७० टक्के पेक्षा अधिक लोकांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने यात गरीबांचे नुकसान होण्याचा धोका संभवतो़ भारतात सर्वात जास्त अल्पसंख्यांक, आदिवासी, गरीब आणि आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले लोक आहेत़ बहुतेकांकडे आपले घर सुध्दा नाही़ ते १९६० पुर्वीचे नोंदणीचे कागदपत्रे कसे काय आणू शकते, असा सवालही उपस्थित केला़ देशाची अखंडता धोक्यात येऊ शकते़, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली़

Web Title: Cancel the updated Citizenship Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे