६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:20 PM2019-12-30T22:20:23+5:302019-12-30T22:21:29+5:30

अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र झाले स्पष्ट : गटात १९७ तर गणातून २७१ उमेदवारांनी घेतली माघार

 . Candidates in the election arena | ६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात

Dhule

Next

धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झालेले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ४६८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने, आता गटात २१६ व गणात ३९७ असे एकूण ६१३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यातील चार गट व दोन गणातील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या ५२ गट व ११० गणांसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार असून, ८ रोजी मतमोजणी होणार आहे.
साक्री तालुक्यातही धाडणे गणाची जागा बिनविरोध
साक्री- जिल्ह्यात सर्वाधिक गट व गण असलेल्या साक्री तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तालुक्यात १७ गट व ३४ गण आहेत. यात गट व गणासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी गटातून ६९ व गणातून ६० उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे १७ गटात १२४ तर ३३ गणांसाठी १८० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
शिंदखेडा
जिल्हा परिषदेच्या १० गट व २० गणांसाठी निवडणूक होत आहे. यात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ४३ तर पंचायत समितीच्या गणातून ६५ उमेदवारांनी माघारी घेतली. त्यामुळे गटात २५ व गणात ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिेले आहे. तालुक्यात एकही जागा बिनविरोध झालेली नाही. अर्ज माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. तालुक्यातील गट व गणातील अनेक ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती होणार आहे. या लढती अतिशय चुरशीची होणार असून, लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
दरम्यान आता जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार असून, ८ रोजी मतमोजणी होणार आह

Web Title:  . Candidates in the election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे