आमदारकीच्या इच्छुकांची ‘सेमिफायनल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:41 AM2019-03-31T11:41:05+5:302019-03-31T11:41:58+5:30

लोकसभा निकालावर बरेच काही अवलंबून : प्रत्येकाचा लागणार कस

Candidate's 'SemiFiinal' | आमदारकीच्या इच्छुकांची ‘सेमिफायनल’

आमदारकीच्या इच्छुकांची ‘सेमिफायनल’

Next

धुळे : लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या विविध पक्षांच्या आमदारांसाठी तसेच त्याच पक्षांमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने मालेगाव मध्य वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. आता तीच आघाडी राखण्यासाठी तसेच त्यात आणखी वाढ करण्यासाठी आमदारांची परीक्षा होणार आहे. तर त्या-त्या मतदारसंघातील अन्य पक्षातील इच्छुकांचाही चांगलाच कस लागणार आहे. विशेष म्हणजे यावरून विविध पक्षातील इच्छुकांच्या परफार्मन्सचे एकप्रकारे ‘आॅडिट’ होणार असून येणाºया ‘रिझल्ट’वर बरेच काही अवलंबून असणार आहे.
धुळे मतदारसंघात भाजपाचे दोन, शिवसेनेचा एक, राष्टÑवादीचा एक, कॉँग्रेसचे दोन आमदार आहेत. रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे शिंदखेडा मतदारसंघातून तर धुळे शहरात भाजपचेच अनिल गोटे, धुळे ग्रामीणमध्ये कॉँग्रेसचे कुणाल पाटील, मालेगाव मध्य मध्ये शेख, मालेगाव बाह्यमधून राज्याचे राज्यमंत्री तथा शिवसेनेचे दादा भुसे व बागलाण मतदारसंघातून राष्टÑवादी कॉँग्रेसच्या दीपिका चव्हाण आमदार आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे डॉ.सुभाष भामरे हे १ लाख ३० हजार ७२३ मतांनी विजयी झाले होते.
त्यावेळी धुळे ग्रामीण व मालेगाव बाह्य या दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपाला १ लाखावर मते मिळाली होती.
मात्र मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपाला अवघी ५ हजार ७८६ मते मिळाली होती.
त्या उलट याच मतदारसंघात कॉँग्रेसला १ लाख २७ हजार ५६० एवढे मताधिक्य प्राप्त झाले होते.
भाजपला शिंदखेडा मतदार संघात ९५ हजार ८५२, धुळे शहरात ९६ हजार ४४२ तर बागलाण मतदारसंघात ८६ हजार ७७ मते मिळाली होती. मताधिक्याचा विचार करता सर्वाधिक ७८ हजार ४४२ मतांची आघाडी धुळे ग्रामीणमधून मिळाली होती.
तर दुसºया क्रमांकाची ६९ हजार ४८६ मतांची आघाडी शिवसेनेचे दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघातून मिळाली होती. शिवसेनेचे दादा भुसे हे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. धुळे शहर मतदारसंघातूनही ४६ हजार ९५५ मताधिक्य मिळाले होते. तर मालेगाव मध्य मतदारसंघात भाजपचे डॉ.भामरे १ लाख २७ हजार ५६० मतांनी पिछाडीवर होते. अशीच आघाडी टिकविण्याचे ‘प्रेशर’ विद्यमान आमदारांसह त्या-त्या मतदारसंघातील विविध पक्षांच्या इच्छुकांवरही आहे.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासमोर धुळे लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धुळे ग्रामीण वगळता उर्वरीत धुळे शहर व शिंदखेडा मतदारसंघात पक्षाचे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याचे आव्हान आहे. धुळे शहरात राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कॉग्रेसचे शहर अध्यक्ष युवराज करनकाळ, शिंदखेड्यात स्वत: जिल्हाध्यक्ष सनेर त्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आमदारांसह इच्छुकही लागले कामाला
४गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपला मात्र शिंदखेडा व धुळे शहर मतदारसंघांमध्येच यश मिळाले. शिवसेनेला मालेगाव बाह्य, राष्टÑवादी कॉँग्रेसला बागलाण आणि कॉँग्रेस पक्षाला धुळे ग्रामीण व मालेगाव मध्य मतदारसंघात यश मिळाले. भाजपाचे आमदार शिंदखेडा, धुळे शहर या मतदारसंघातील मताधिक्य टिकविण्यासह आपला गड राखण्यासाठी जसे कसून प्रयत्न करत आहेत तशाच पद्धतीने कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसमधील इच्छूकही कामाला लागले आहेत.
४प्र्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असून पक्षनेत्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांच्या परफॉर्मन्सचेही आॅडिट होणार आहे. लोकसभा निवडणूक आटोपली की तिच्या निकालावर चर्चा करता करता विधानसभेची निवडणूक येऊन ठेपणार आहे. त्यामुळे लोकसभेत मतांची दरी कमी-जास्त झाली तर ती विधानसभेत भरून काढण्यासाठी उमेदवारांकडे फारसा वेळ असणार नाही. त्यामुळे विधानसभेसाठी प्रत्येक आमदार अन इच्छुकांना लोकसभेची निवडणूक हीच ‘सेमिफायनल’ समजून काम करावे लागणार आहे.

Web Title: Candidate's 'SemiFiinal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.