सुकवद येथे बिबट्या कॅमेºयात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:55 PM2018-04-22T17:55:00+5:302018-04-22T17:55:00+5:30

ग्रामस्थांमध्ये दहशत : ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन

Capture of a leopard camera at Sukawad | सुकवद येथे बिबट्या कॅमेºयात कैद

सुकवद येथे बिबट्या कॅमेºयात कैद

Next
ठळक मुद्देयेथील परिसरात असलेला बिबट्या हा सायंकाळी व पहाटे अशा  दोन वेळा भक्षाच्या शोधात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापार्श्वभूमीवर वनविभागाचे वनक्षेत्रपाल के. वाय. माने, वनपाल आर. ई. पाटील यांनी शेतकºयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावात कोणीही एकटे फिरू नये, तसेच घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन तिला घुंगरू बांधावेत, असे सांगण्यात आले आहे.  दरम्यान, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा  :  तालुक्यातील सुकवद येथे गेल्या एक महिन्यांपासून बिबट्याची दहशत आहे. पुन्हा एकदा येथील परिसरात बिबट्याचा संचार असल्याची बाब समोर आली. येथील परिसरात वन विभागाने लावलेल्या कॅमºयात  शनिवारी सायंकाळी व रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या कैद झाला आहे. दरम्यान, वनविभागाने येथील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 
सुकवद येथील आण्णा पाटील यांच्यावर १ एप्रिल रोजी मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या दिवसांपासून वन विभागाने या ठिकाणी कॅमेरा लावला होता. या कॅमेºयात बिबट्या कैद झाला आहे. त्यात तो एकटाच दिसत आहे. ‘लोकमत’ ने येथील परिसरात वाघ नसून बिबट्या असल्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त खरे ठरले आहे. 
वनविभागाकडे  तक्रार 
शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील तापी नदीच्या खोºयात काटेरी झुडपात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुकवद येथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. त्यानुसार या भागात ३ एप्रिलपासून वन विभागाचे चार कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. तर चार ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून हा बिबट्या कुणालाही दिसला नाही. तसेच कॅमेºयातही कैद न झाल्यामुळे बिबट्या या भागातून गेला की काय? असे वाटत होते. मात्र, त्यानंतर वन विभागाने पुन्हा नव्याने दोन कॅमेरे बसविल्यामुळे शनिवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास व रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्या कैद झाला आहे. 

Web Title: Capture of a leopard camera at Sukawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.