खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर आंदोलकांचा थयथयाट, काचाही भूगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 03:43 PM2018-08-05T15:43:17+5:302018-08-05T15:43:49+5:30
मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर थयथयाट केला आहे. त्यानंतर गावित यांच्या गाडीची तोडफोडही केली. यावेळी पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
धुळे - मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर थयथयाट केला आहे. त्यानंतर गावित यांच्या गाडीची तोडफोडही केली. यावेळी पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी खासदार डॉ. हिना गावीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्या होत्या. यावेळी संतप्त आंदोलकांच्या आक्रोशाचा सामना गावीत यांना करावा लागला.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान येथील खासदार डॉ.हिना गावीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी येत होत्या, त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार गावीत यांच्या गाडीवर चढून थयथयाट केला. गाडीच्या टपावर चढून मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. त्यानंतर काही आंदोलक कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचाही फोडल्या. त्यामुळे पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे धुळे जिल्हाधिकारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.