आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 10:52 PM2020-01-07T22:52:31+5:302020-01-07T22:52:45+5:30

सिमरीता बठीजा : सिंधुरत्नोत्सवतर्फे आयोजन

 Career in the area of your choice | आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करा

Dhule

googlenewsNext

धुळे : पालकांनी मुलांना त्यांचा आवडीप्रमाणे करीअर निवडण्याची संधी द्या, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी परिश्रमा शिवाय पर्याय नसतो़ मात्र मुलांनी जर त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करीअर करण्याची अशा बाळगली असेल तर त्यांना निश्चित यश मिळविता येवू शकते़ असे प्रतिपादन मिस इंडिया सिमरिती बठिजा यांनी केले.
शहरातील हिरे भवन येथे सिंधुरत्न एसव्हीसी इंग्लिश स्कूलतर्फे सिंधुरत्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी सिंधी साहित्य अकादमीचे सदस्य सुरेश कुंदनाणी अध्यक्षस्थानी होते. सिंधुरत्न संस्थेचे माजी विद्यार्थी आकाश ग्यानचंदानी, पूनम वाडेकर, तनुकुमार दुसेजा, जेठानंद हासवाणी, जमनू लखवाणी आदी उपस्थित होते. सिमरिती बठिजा म्हणाल्या की, लहानपणापासूनच मिस इंडिया होण्याचे स्वप्न होते; परंतु हा प्रवास सोपा नव्हता. यश मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे अडथळे पार करावे लागले. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागते. आई-वडिलांनी मुलांना प्रोत्साहन दिले तर मुले सहज यश मिळवतात. पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्यावे. त्यातच मुलांचे हित असते, असेही त्या म्हणाल्या.
या वेळी मान्यवरांना सिंधी परंपरेनुसार सिंधी टोपी देण्यात आली. तसेच सन्मानचिन्ह देण्यात येऊन त्यांचा सत्कार झाला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
सूत्रसंचालन भावना बागले यांनी केले. महोत्सवाचे देवरे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रमोद कचवे व अजय नाशिककर यांच्या हस्ते पहिल्या दिवशी उदघाटन झाले.

Web Title:  Career in the area of your choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे