चालकाने केले पोकलॅण्डचे सहा लाखांचे सुटे भाग लंपास
By admin | Published: July 15, 2017 05:50 PM2017-07-15T17:50:10+5:302017-07-15T17:50:10+5:30
सुरत नागपूर महामार्गावरील घटना. साक्री पोलिसात गुन्हा दाखल
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.15 - सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरु आह़े त्या कामावरील ठेकेदाराच्या मालकीचे पोकलॅण्ड मशीनचे सहा लाख रुपये किमतीचे भाग काढून घेतले. या प्रकरणी ठेकेदाराने साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ठेकेदार दत्तात्रय संपत राजोळे (रा़ खडकमाळेगाव ता़ निफाड) यांची पोकलॅण्ड मशीन सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणात कामासाठी दिली आह़े मुकेश कुमार (पत्ता माहित नाही) या चालकाकडे पोकलॅण्ड मशीन सांभाळण्याची जबाबदारी दिलेली होती़ हे मशीन साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणालगत ठेवली जात होत़े
12 जुलै रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास मशीन चालक मुकेश कुमार याने पोकलॅण्ड मशीनमधून कंट्रोल वॉलचे तीन रिले फॉल अंदाजे सहा लाख रुपये किंमतीचे भाग काढून घेत पलायन केल़े दुस:या दिवशी ठेकेदाराने त्याची चौकशी केली़ तेव्हा पोकलॅण्ड मशीनमधले किमती भाग चोरीला गेल्याचे व चालकानेही पलायन केल्याचे लक्षात आल़े तेव्हा ठेकेदार दत्तात्रय राजोळे यांनी साक्री येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आह़े