शिरपुरात गुजराथ,हैद्राबादच्या कैरीचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 08:50 PM2019-06-26T20:50:44+5:302019-06-26T20:51:03+5:30
खरेदीसाठी गर्दी : २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो भावाने होतेय् विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरातील खंडेराव मंदिर परिसरात भरणाºया कैरीच्या बाजारात सरासरी २५ रूपयांपासून तर ३५ रूपये प्रतिकिलो प्रमाणे लोणच्याची कैरी या बाजारात विकली जात आहे. गुजराथ, हैद्रराबाद, धरमपुरा आदी भागातून कैरी विक्रीला येत आहे.
येथील बाजारात बाहेरील व्यापारी कैरी विक्रीसाठी आणत आहे. या वर्षी लोणच्यासाठी आलेली कैरी ही निलम, राजापुरी, सरदार आंब्याचीच येत आहे. गावराणी कैरी विक्रीला येत नाही.
लोणच्यासाठी आंबट कैरी आवश्यक असते. परंतु ती बाजारात नसल्याने सरदार व राजापुरी कैरीच ग्राहकांना नाईजास्तव घ्यावी लागली़
सरासरी २५ रूपयांपासून तर ३५ रूपये प्रतिकिलो प्रमाणे लोणच्याची कैरी या बाजारात विकली गेली. कैरीचा बाजाराबरोबरच लोणच्यासाठी आवश्यक असलेला गरम मसाला, लसुण, धने, राई तसेच मातीचे खारे व चिनी मातीच्या भरण्या विक्रीसाठी बाजारात होत्या. १०० रूपयापासून ते ५०० रूपयापर्यंत भाव होते. ते खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांची गर्दी झाली होती.
शिरपूर येथील कैरीच्या बाजारात खरेदी करण्यासाठी तालुक्यातूनच नव्हेतर जळगाव जिल्ह्यातील चोपडा, मध्यप्रदेशातील सेंधवा येथूनही लोक येतात.
*कैरी फोडण्याचे स्टॉल*
विशेष म्हणजे या बाजारात कैºया सुध्दा फोडून देण्यासाठी अनेकांनी स्टॉल लावले आहेत. बाजारात ५ रूपये किलोप्रमाणे कैरी फोडून देण्यात येते. याठिकाणी कैरी फोडून घेण्यासाठी गर्दी दिसून आली. बाजारात आलेल्या अनेकांनी घरी जावून कैरी फोडण्यापेक्षा येथून फोडून घेणे अनेकांनी पसंत केले. कैरी फोडण्याचा सुडा देखील १५०-२०० रूपयापर्यंत बाहेरील लोक विक्री करण्यासाठी आले होते़.