चोरीच्या घटनेतील मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 04:43 PM2019-01-02T16:43:42+5:302019-01-02T16:45:01+5:30

पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांची माहीती

 In the case of theft, the accused in Madhya Pradesh | चोरीच्या घटनेतील मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील नेर येथील जेैन मंदिरात चोरीची घटनेचा तालुका पोलिसांनी तपास करत मध्यप्रदेश राज्यातील सात आरोपी ताब्यात घेतल्याची माहीती पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली़
नेर येथील जैन मंदिरातील कुलप तोडून, तिजोरी रूमचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून रूम मधील ८ लाख ३५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चांदीच्या वस्तु व दक्षणा चोरीला गेली होती़ याबाबत पोलिसांनी तपास करून मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील मोहाला व वायक्या येथील आरोपी केल्याची माहीती पोलिसाना मिळाली होती त्यानुसार गौतम उर्फ शोभाराम खुमसिंग भिलाला (मोरे),(वय २६ रा़ मोहाला), यास सेंधवा येथुन अटक केली़ त्याचे कडून माहीती मिळल्यानंतर राधु बांगड्या डावर (भिलाला) वय २६, गंंगाराम उंदर्या भांगड्या (तडवी) वय ३० रा़मोहाला ता़सेंधवा, झिना अमरसिंग डावर वय २२, गणेश उर्फ दगड्या केऱ्या सोळंकी वय २३, मन्या उर्फ मोहन भुरला भिलाला, वय ४५ या सात आरोपीचा या चोरीत समावेश होता़ दरम्यान त्यांच्याकडून एक लाख तसेच १० किलो चांदी हस्तगत करण्यात आली़ गुन्ह्यातील उर्वरीत आरोपी जतन रूमसिंग तडवी़ रा़मोहाला ता़सेंधवा, टेपा हे फरार झाले असुन त्यांचा शोध सुरू आहे़ सदर कारवाई पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपपोलिस अधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पो़निरीक्षक दिवानसिंग वसावे, राहूल गवई, अनिल पाटील, सुनिल विंचुरकर, नथ्थू भामरे, सतिष कोठावदे, मनोज पाटील, चेतन कंखरे, प्रमोद इशी, गोविंद पावरा, देसले यांच्या पथकान कारवाई केली़

Web Title:  In the case of theft, the accused in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे