ख्रिश्चन धर्मातील कॅथोलिक व प्रोटेस्टंट पंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:35 PM2019-12-21T22:35:11+5:302019-12-21T22:35:45+5:30

संडे अँकर । शिरपूर कॅथोलिक पंथाकडून आदिवासी भागात शिक्षणाचे भरीव काम

Catholicism and Protestant Creed in Christianity | ख्रिश्चन धर्मातील कॅथोलिक व प्रोटेस्टंट पंथ

ख्रिश्चन धर्मातील कॅथोलिक व प्रोटेस्टंट पंथ

googlenewsNext

सुनील साळुंखे ।
शिरपूर : शहरासह तालुक्यात ख्रिश्चन धर्मातील कॅथोलिक व प्रोटेस्टंट हे दोन पंथातील लोक राहतात़ मात्र येथे चर्च नसून एका हॉलमध्ये नाताळ सण साजरा केला जातो़ विशेषत: कॅथोलिक पंथाकडून तालुक्यात आदिवासी भागात जनजागृतीबरोबर शिक्षणाचे भरीव काम केले जात आहे़
एस़ ए़ मिशन चर्च
शहरातील नगरपालिका समोर सुवार्ता अलायन्स चर्चची (एस़ए़मिशन) स्थापना सन १९०४ मध्ये करण्यात आली आहे़ या चर्चमध्ये ‘प्रोस्टेस्टंट’ पंथाला मानणारे ख्रिश्चन बंधू राहतात़ या पंथाचे ४०-४५ कुटुंब येथे आहेत़ १९३० पासून या संस्थेमार्फत आदिवासी समाजातील मुलांना या वसतीगृहात राहण्याची सोय केली जाते़ दरवर्षी ४०-४५ मुले नियमित राहतात़ काही वर्षापूर्वी सुसज्ज अशी इमारत सुध्दा बांधण्यात आली़ वसतीगृहातील मुलांची संख्या कमी झाल्यामुळे संस्थेमार्फत तेथे गेल्यावर्षापासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आलेत़ मात्र, पुरेशी विद्यार्थी संख्या न मिळाल्यामुळे ते ही बंद पडले़ या परिसरात राहणाऱ्या लोकांनी दारी आकाश कंदिल व परिसर रंगेबेरंगी पताकांनी सजविलेला दिसतो़
ख्रिश्चन धर्मात ‘प्रोस्टेस्टंट’ पंथाची सुरूवात मार्टीन लुथर या युरोपियन विचारवंतामुळे झाली़ ख्रिश्चन धर्मातील कॅथोलिक पंथ हा पुरातन काळातील आहे़ युरोपिय देशांमध्ये धर्म संस्थेत काही प्रथा होत्या़ त्या विरोधात मार्टीन लुथर व काही विचारवंतांनी त्यास विरोध केला़ या विरोधास ‘प्रोस्टेट’ असे म्हणतात़ प्रोस्टेट या शब्दावरून ‘प्रोस्टेस्टंट’ हा पंथ ख्रिश्चन धर्मात उदयास आला़ मार्टिन लुथरचे अनुयायी होते़ त्यांना ‘प्रोस्टेस्टंट’ म्हणून ओळखले जाते़ पुढे ख्रिश्चन धर्मातील ‘प्रोस्टेस्टंट’ पंथ संपूर्ण जगभर पसरला़ सत्य, प्रेम, विश्वास, शांती या तत्वावर आधारलेल्या या धर्माचा जगभर प्रसार झाला़
ख्रिस्ती अनुयायानुसार उध्दारक व पापी जनांना पापातून सुटका-मुक्ती-मोक्ष देण्यास आलेला येशू ख्रिस्त गव्हाणीत जन्मला़ त्यांच्या जन्माच्यावेळी अनेक चमत्कार झाले़ मरीयेला तिच्या उदरी जन्म घेणाºया बाळाचे नाव देखील देवदूताने सांगितल्याची आख्यायिका आहे़ त्यांचे नाव येशू ठेवण्यास सांगितले होते़ येशू या नावाचा अर्थ मुक्तीदाता व तारणारा असा आहे़
जगाचा तारणारा राजवाड्यात नव्हे तर लिन आणि नम्र होवून गाईच्या गोठ्यात जन्मला़ येशू ख्रिस्त मोठा होईपर्यंत प्रत्येक वेळी देवदूत येवून येणाºया संकटांची जाणीव करून देत होता़ तीन खगोलशास्त्री आकाशात एका नवीन ताºयाचा उदय का झाला? या प्रश्नाचे उत्तर शोधीत येशूबाळापर्यंत येवून पोहचलेत़ येशू ख्रिस्तांचा जन्म जगाच्या उध्दाराकरीता झाला़
इथून घडले...
आमदार काशिराम वेचान पावरा हे विश्वसेवा मंडळाच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेतले आहे़ अध्यात्मिक विचारांवर त्यांचे प्रभुत्व आहे़ या संस्थेचा माजी विद्यार्थी आमदार पदापर्यंत पोहचल्याचे त्यांना आत्मसमाधान आहे़
अनौपचारीक वर्गात शिक्षण घेणारा विनोद पावरा हा विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करून जे़जे़हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे़
शहरातील नगरपालिका समोरील एस़ए़मिशन येथे चर्च नसून एका बंगल्यात नाताळ सण साजरा केला जातो तर विश्व मंडळ येथे ही चर्च नसून एका हॉलमध्ये साजरा केला जातो़

Web Title: Catholicism and Protestant Creed in Christianity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे