गुरे मोकाट तर ‘मालक’ जाणार आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:10 PM2019-09-20T22:10:44+5:302019-09-20T22:11:24+5:30
महापालिका : पोलिसांच्या मदतीने मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल होणार
धुुळे : आता महापालिकेने रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे पकडण्यासाठी अडीच लाखांचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे़ ठेकेदाराकडून जप्त केलेली जनावरे गो-शाळेत संगोपनासाठी पाठविण्यात येईल. ही जनावरे रस्त्यावर मोकाट सोडणाºया मालकाकडून गुरांच्या संगोपनाचा खर्च दंड म्हणून वसूूल करण्यात येईल. तसेच मोकाट जनावरासंदर्भात नोटीस बजावूनही जर जनावरांच्या मालकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्याविरोधात या कायद्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तीन महिन्याची जेलची हवा खावी लागणार आहे. याशिवाय तीन हजाराचा दंड ठोठविण्याची तरतूद ही करण्यात आली आहे.
दोनशे चौकात दोन हजार गुरे
पाच कंदील चौक, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक, आग्रारोड, फाशीपुल, मनपाच्या जुन्या इमारतीजवळ, दत्त मंदिर चौक, अग्रसेन महाराज चौक, बारा पत्थर, पारोळा चौफुली अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकात पाच ते सहा जनावरे ठ्यिा मारून बसतात़ शहरातील दोनशे चौकात अंदाजे दोन हजार जनावरांचा मुक्तपणे संचार आहे़
अशी होणार आता कारवाई
शहरात सर्रासपणे मोकाट जनावरे सोडली जातात़ त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होत असल्याने मनपा व वाहतूक शाखेतर्फे मुंबई पोलिस कायद्याच्या कलम ९० अ, ११८ नुसार गुरांच्या मालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे़
जनावरे जप्त केली जाणार
जनावरे मोकाट सोडून देणाºया मालकांवर दंड व फौजदारी कारवाई केली जाणार आहेत. लवकरच रस्यावर फिरणारी मोकाट जनावरे पकडली जाणार आहे़ जप्त केलेली जनावरे पांजरापोळ किंवा इतर खाजगी गोशाळा ठेवण्यात येणार आहे़ मालकास आपले जनावर पुन्हा मिळावे यासाठी मनपाचा दंडासह प्रती जनावरे ३५० रुपये गोशाळेस प्रतिदिन द्यावे लागणार आहे. दरम्यान जनावर मृत झाल्यास पालिका अथवा गोशाळा जबाबदार राहणार नाही. तसेच २१ दिवसांच्या आत जनावर परत न नेल्यास त्याची मालकी पांजरापोळ संस्थेस दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे़
कोंडीचा प्रश्न सुटेल
शहरातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो़ रस्त्यावर अचानकपणे जणावरे रस्ता ओलांडतात असल्याने अपघात होतात़ मनपाच्या या निर्णयांनतर अपघात व वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटू शकणारा आहे़
पोलीसांना दिली जाणार माहिती
नवनियुक्त आयुक्त अजिज शेख यांनी गुरांच्या प्रश्न सोडविण्यासाठी तातडीची बैठक घेवून रस्त्यावर गुरे सोडणाºया मालकांना वारवांर नोटीस बजावून देखील दखल न घेणाºया मालकांवर मनपा अधिनियमानुसार कारवाई करण्याचा आदेश मनपाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे़ त्यानुसार आता पोलिस प्रशासनाची मदत घेऊन मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे़
ई निविदेतून जप्तीचा ठेका
विधानसभा आचार संहितेपूर्वी मनपाने अकरा महिन्यासाठी अडीच लाखांची तात्पुती निविदा काढली आहे़ निविदा घेणारी संस्था किंवा ठेकेदाराला शहरातील मोकाट जनावरे (गाय, म्हैस, बैल ) पकडून खाजगी गो-शाळेकडे जमा करावी लागणार आहे़ आचार संहितेनंतर कारवाईसाठी स्वंतत्र पथक नियुक्त करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली़