गणेशोत्सव, नामसप्ताह महोत्सव सामंजस्य व शांततेत साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 10:50 PM2019-09-06T22:50:35+5:302019-09-06T22:50:54+5:30

विश्वास पांढरे : विविध सूचना उपस्थित, समन्वय राखण्याचे आवाहन

Celebrate Ganeshotsav, Names Week Festival in harmony and peace | गणेशोत्सव, नामसप्ताह महोत्सव सामंजस्य व शांततेत साजरे करा

सभेत बोलताना विश्वास पांढरे. सोबत अधिकारी, पदाधिकारी. 

Next

पिंपळनेर : येथील नामसप्ताह महोत्सव व गणेशोत्सव तसेच इतर सण उत्सव सर्व नागरिकांनी समन्वय, सामंजस्य व  शांततेने साजरे करावेत. शहराचा लौकीक कायम राखण्यासाठी गावातील विविध समित्यांनी सहकार्य करून सर्व उत्सव यशस्वी करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी येथील पोलीस ठाण्यात नुकत्याच आयोजित  शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना केले.
याप्रसंगी विठ्ठल मंदिर.       संस्थानचे मठाधिपती हभप योगेश्वर महाराज देशपांडे, तहसिलदार सूचिता भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, डॉ. मोहने, जि.प.सदस्य विलास बिरारीस, धनराज जैन, माजी सभापती संजय ठाकरे, सरपंच साहेबराव देशमुख, सतीश शिरसाठ, प्रमोद गांगुर्डे, बाबा पेंढारकर, सुनील लोखंडे, जहुर जहागीरदार, योगेश बधान, देवेंद्र कोठावदे, उपसरपंच तुकाराम दहिते आदी उपस्थित होते.
समन्वयाने उत्सव साजरा करा  
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांचा पूष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. बैठकीत हभप योगेश्वर महाराज देशपांडे यांनी कुस्ती संकुलाच्या बाहेर असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी करून  यात्रोत्सव व पालखी सोहळा  महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून विविध सूचना केल्या. तर प्रमोद गांगुर्डे, राजेंद्र गवळी, सुभाष महाजन यांनी मोकाट गुरांसह रस्ते, वाहतुकीचा प्रश्न, पार्कीग, चौकाचौकात पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त ठेवणे,  प्राथमिक आरोग्य सेवा आदी सूचना मांडल्या. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुस्ती समिती नव्याने गठीत करण्याबाबत काही वाद असल्यास  एकत्रित येऊन कुस्ती दंगल पार पाडावी, असेही  अधीक्षक पांढरे यांनी सांगितले. 
यावेळी उपनिरीक्षक लोकेश पवार, हंडोरे, नºहे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर अभियंता दीपक कापसे, मोतीलाल पोतदार, रवींद्र सोनवणे, अभियंता माळी,जगदीश ओझरकर, सुभाष जगताप, विशाल गांगुर्डे, हे.कॉ.रणधीर, हे.कॉ.खैरनार, भूषण वाघ तसेच गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Web Title: Celebrate Ganeshotsav, Names Week Festival in harmony and peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे