‘प्रेमाचा दिवस’ शांततेत साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:38 PM2019-02-13T22:38:54+5:302019-02-13T22:40:45+5:30
पोलीस प्रशासन : शहरात राहणार यंत्रणा सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : व्हॅलेंण्टाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस हा सर्वत्र साजरा केला जातो़ धुळ्यात देखील हा दिवस साजरा होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी तरुण-तरुणांनी घ्यावी़ सर्वांनी कायद्याचे पालन करावे़ अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी केल्या आहेत़
विरोधाची शक्यता
दरवर्षाप्रमाणे यंदाही व्हॅलेंण्टाईन डे हा दिवस सर्वत्र साजरा होणार आहे़ पाश्चात्य संस्कृति असल्याचे सांगत काही पक्षाच्या पदाधिकाºयांकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़
विद्यार्थ्यांचा जल्लोष
प्रेमाच्या दिवसाच्या औचित्य साधून काही तरुण-तरुणींकडून महाविद्यालय परिसरात जल्लोष होऊ शकतो़ त्यामुळे याठिकाणी महाविद्यालयाच्या प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे़
गरज भासल्यास बंदोबस्त
हा दिवस कोणी साजरा करतो तर काही जणांकडून विरोध होत असतो़ विरोधाला डावलून हा दिवस जल्लोषात साजरा करण्याचे प्रमाण तुलनेत जास्त आहे़ त्या अनुषंगाने साध्या वेशात पोलिसांचा बंदोबस्त राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही़
दरम्यान, प्रेमाच्या या दिवसाचे शांततेने आणि आनंदाने स्वागत करायला हवे़