मराठा अर्जदारांना प्रमाणपत्र वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:33 AM2018-12-24T11:33:30+5:302018-12-24T11:34:22+5:30

गणेश मिसाळ : आतापर्यंत ३४ अर्जदारांना दिले प्रमाणपत्र

Certificate of allotment to Maratha applicants | मराठा अर्जदारांना प्रमाणपत्र वाटप 

मराठा अर्जदारांना प्रमाणपत्र वाटप 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सरकारने ७ डिसेंबरला काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा आरक्षणासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना धुळे उपविभागात मराठा प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीने वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ३४ अर्जदारांना प्रमाणपत्र वितरीत झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली़
नुकतेच प्रातिनिधीक स्वरूपात शंतनू गणेश नरवाडे, चारूदत्त गणेश नरवाडे, प्रतिक्षा विजय मोरे या तीन विद्यार्थ्यांना मराठा जातीचा दाखला प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांचे हस्ते वितरित करण्यात आला़ यावेळी तहसीलदार अमोल मोरे, महा-ई-सेवा केंद्राचे चालक सचिन बागुल व पंकज बागुल, लिपिक समाधान शिंदे हे उपस्थित होते. ज्यांना मराठा जात प्रमाणपत्र हवे असेल त्या अर्जदारांनी आपले सरकार केंद्र अथवा महा-ई-सेवा केंद्रात विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह आॅनलाइन अर्ज सादर करावा. मराठा जातीचे अर्जासोबत सन १९६७ पूर्वीचा मराठा जातीचा धुळे अथवा साक्री तालुक्यातील मूळ पुरावा सोबत स्कॅन करून जोडावा. ज्यांचा रहिवास हा धुळे उपविभागाच्या बाहेरील आहे त्यांनी आपल्या मूळ रहिवासाच्या ठिकाणावरून हा दाखला काढावा असे आवाहन प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी केले. या दाखल्यासाठी केवळ ५६ रुपये इतके सेवाशुल्क निर्धारित करण्यात आले आहे़ 

Web Title: Certificate of allotment to Maratha applicants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे