साठीतही ‘छगन सरकार’चे पिस्तूलचाळे!

By admin | Published: February 23, 2017 12:31 AM2017-02-23T00:31:49+5:302017-02-23T00:31:49+5:30

साठ वर्षीय छगन सरकार या कुख्यात गुन्हेगाराकडून १० हजार रुपये किमतीचे बनावट पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली.

Chagan Sarkar's pistol | साठीतही ‘छगन सरकार’चे पिस्तूलचाळे!

साठीतही ‘छगन सरकार’चे पिस्तूलचाळे!

Next

धुळे : थाळनेर बसस्थानकाजवळ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी साठ वर्षीय छगन सरकार या कुख्यात गुन्हेगाराकडून १० हजार रुपये किमतीचे बनावट पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली. अटकेतील छगनला न्यायालयाने  तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक विजय तलवारे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छगन सरकार उर्फ छगन किसन कोळी (वय ६२, रा़ भोरटेक ता़ शिरपूर) याच्याकडून एक बनावट पिस्तूल, त्यावर मेड इन जपान असे इंग्रजीत लिहिलेले व मॅक्झिनमध्ये ३ जिवंत काडतुसे मिळून आली.दहा हजार रुपये त्याची किंमत आहे.
छगन सरकारविरुद्ध शिरपूर आणि थाळनेर पोलिसात यापूर्वीही खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे़

Web Title: Chagan Sarkar's pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.