धुळे शहरात चेन स्नॅचिंग, मोबाईल आणि दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:25 PM2018-02-09T15:25:39+5:302018-02-09T15:35:39+5:30
चौघांचा समावेश : तीन दुचाकी, मंगलपोत आणि मोबाईल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात दुचाकी, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल चोरणाºया चार लोकांची टोळी देवपूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या तीन दुचाकी, तीन मोबाईल आणि एक सोन्याची मंगलपोत पोलिसांनी जप्त केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील नगावबारी परिसरातील एक व वाडीभोकर गावातील तीन तरुणांना देवपूर पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शहरात घडलेल्या सात गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एम.एच.३९ टी ७८४४, एम.एच.१८ क्यू ७५७२ आणि एम.एच.३९ टी ७८४४ अशा क्रमांकाच्या चोरीस गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. तसेच चोरीस गेलेले दोन मोबाईल आणि सोन्याची मंगलपोत असा एकूण ९३ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यांच्याकडून शहरासह जिल्ह्यात घडलेल्या आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. देवपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अकबर ए.पटेल, सहायक पोलीस उपनिरीक्षक एन.एम. शेमडे, सी.एस.चातुरे, हेकॉ पंकज चव्हाण, कैलास पाटील, चंद्रशेखर नागरे, कबीर शेख, संदीप अहिरे, प्रविण थोरात, विनोद आखडमल, नरेंद्र शिंदे यांनी कामगिरी बजावली.