धुळ्यात गुन्हेगारांना वेसण घालण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:45 PM2019-07-21T22:45:15+5:302019-07-21T22:45:37+5:30

पोलीस अधिकाºयांची बदली : गुन्हेगारीमुळे त्रस्त सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या

The challenge of inspecting criminals in Dhule | धुळ्यात गुन्हेगारांना वेसण घालण्याचे आव्हान

धुळ्यात गुन्हेगारांना वेसण घालण्याचे आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी शनिवारी आपल्या अधिकाराचा वापर करुन ३३ अधिकाºयांच्या बदल्या केल्या आहेत़ त्यातून नव्याने रुजू झालेल्या अधिकाºयांना आता गुन्हेगारांना वेसण घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे़ काही अधिकाºयांच्या कामांची जबाबदारी वाढविण्यात आली आहे़ बदल्या केल्यामुळे गुन्हेगारीमुळे त्रस्त सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविकच आहे़  
विश्वास पांढरे यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी चांगलीच जाणून घेतलेली आहे़ त्याअंतर्गत त्यांनी स्वत:ला असलेल्या अधिकाराचा दुसºयांदा वापर करत काही अधिकाºयांच्या शनिवारी सायंकाळी अचानक बदल्या केल्या आहेत़ त्यात काही अधिकारी बाहेरील जिल्ह्यातील असल्याने त्यांना चांगले काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे़ तर काही इथल्याच अधिकाºयांचे मात्र खांदेपालट केलेले आहे़ त्याचवेळेस ज्यांचे काम उल्लेखनीय आहे, त्यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे़ काही अधिकाºयांना मात्र कामाची पावती म्हणून मोठ्या पोलीस ठाण्यात कामांची संधी मिळवून दिलेली आहे़ 
तत्कालिन पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी सुध्दा आपल्या अधिकाराचा वापर करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाºयांच्या बदल्या केल्या होत्या़ त्यातून सुध्दा ‘कही खुशी, कही गम’ असे काहीसे प्रतिबिंब पोलीस प्रशासनात उमटले होते़ तेच प्रतिबिंब यंदाही उमटू लागलेले आहे़ 
क्रीम पोलीस स्टेशन मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती़ त्यात काहींना यश आले तर काही यशाच्या उंबरठ्यापर्यंतच पोहचू शकले़ या चढाओढीत कोणाला किती यश मिळाले, हे ज्याचे त्याला ठाऊक़ पोलीस कर्मचाºयांच्या पाठोपाठ आता पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांची बदली विद्यमान पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी शनिवारी केली आहे़  
शहरासह जिल्ह्यातील अशी काही पोलीस ठाणे आहेत की दुय्यम दर्जाचे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून ते सांभाळत होते़ मोठ्या घटना घडमोडी घडल्यास सक्षम अधिकारी हवा अशी ओरड कायम होत होती़ आता त्याच ठिकाणी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हा मोठा निर्णय घेण्यात आल्याने कौतूकच आहे़ पण, अचानक झालेल्या अधिकाºयांच्या बदल्यामागील गुपीत मात्र अद्यापही समोर आलेले नाही़ बदली, बढती तर होणारच़ पण, अचानक झालेल्या या बदल्या पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला आहे़  
लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच येणाºया विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजिले जात आहे़ घडणाºया घटना आणि घडामोडीचा दररोज अहवाल घेतला जाणार आहे़ त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही असा प्रयत्न सुरु असल्याचे जाणवते़ तरीदेखील आत्तापासून पोलीस विभागाचे अंतर्गत नियोजन सुरु झाले असल्याचे समोर येत आहे़ जिल्ह्यात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न झाले पाहीजे, अशी अपेक्षा आहे़ 
दरम्यान, पोलीस अधिकाºयांच्या बदल्या हा एकच विषय सध्या पोलीस दलात सुरु आहे़ यात सर्वाधिक बाहेरुन जिल्ह्यात आलेल्या अधिकाºयांचा समावेश आहे़ त्यामुळे त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी ते कशारितीने पार पाडतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे़ 
वाहतूक शाखेसह विशेष शाखेकडे लक्ष देण्याची आवश्यकता
शहरातील वाहतूक समस्या कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे़ आग्रा रोडवरील हॉकर्स आणि त्यांचा प्रश्न हा जटील होत आहे़ महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या समन्वयातूनच हा प्रश्न निकाली निघू शकतो़ त्यामुळे या विभागात येणाºया नव्या अधिकाºयाला हा वाहतूक समस्येसह आग्रा रोडवरील कोंडी सोडविण्यासाठी विद्यमान प्रश्न समजून घेणे आवश्यक असणार आहे़ 
पोलीस प्रशासनातील विशेष शाखेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ नियोजनाचे काम या विभागाकडे असते़ नियोजन परिपूर्ण असेल तर अडचणी येत नसतात, आता हे वेगळे सांगायला नको़ 
शिरपूर तालुक्यात बनावट दारु आणि त्याची तस्करी हा मोठा प्रश्न आहे़ हा प्रश्न समजून घेत तो निकाली काढण्याची मोठी जबाबदारी संबंधित अधिकाºयांवर सोपविण्यात आलेली आहे़ 

Web Title: The challenge of inspecting criminals in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.