धुळे जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय टिकविण्याचे आव्हान!
By Admin | Published: April 24, 2017 04:45 PM2017-04-24T16:45:37+5:302017-04-24T16:45:37+5:30
चारा टंचाई : मालपूर, सुराय, वैंदाणे, कर्ला, परसोळे आदी भागात चा:यासाठी पशुपालक शेतक:यांची भटकंती
मालपूर,जि.धुळे,दि.24- शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह, सुराय, वैंदाणे, कर्ला व परसोळे आदी परिसरात सद्य:स्थितीत चारा टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी व पशुपालकांसमोर दुग्ध व्यवसाय टिकविण्याचे आव्हान आहे. रणरणत्या उन्हात चा:यासाठी बरेच फिरावे लागत असल्याने शेतकरी व पशुपालकांची चांगलीच दमछाक होत आहे.
मालपूर हे दुग्ध व्यवसायात जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे गाव आहे. शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय येथील बहुतांश शेतकरी करतात. यावर्षी कमी पाऊस झाल्याने दोन्ही हंगामात शेतक:यांच्या पदरी निराशाच पडली. परिणामी, शेतीतून कुठलेही उत्पन्न मिळाले नाही. दुग्ध व्यवसायावर येथील अनेक पशुपालकांचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे दुष्काळात कुटुंबाला तारण्यासाठी दुधाचा धंदा उत्तम म्हणून अनेकांनी मालपूर गावात थांबूनच चा:याची शोध मोहीम सुरू केली आहे.
चारा साठवणुकीकडे भर
दुग्ध व्यवसायात हिरवा व कोरडा चारा मुबलक प्रमाणात लागतो. यासाठी मात्र, मोठी शोध मोहीम येथील शेतक:यांना करावी लागत आहे. चारा टंचाईमुळे काही शेतकरी त्यांचा शेतात बाहेरून चारा आणून साठवणूक करताना दिसत आहेत. शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा, धुळे येथील सदन शेतकरी चारा विक्रीसाठी येत असतात. मात्र, ते दररोज येतील, याची शास्वती नसल्यामुळे अनेक जण चारा साठवणुकीवर भर देत आहेत.सद्य:स्थितीत गावात मका पिकाचा चारा विक्रीसाठी दाखल होत असून तोदेखील पुरत नसल्याने येथील पशुपालक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सकस चा:यासाठी धावपळ
कोरडा व हिरवा असा दोन्ही प्रकारचा चारा योग्य प्रमाणात गायी व म्हशींना दिला तर त्यांच्या पासून मिळणा:या दूधात फॅट चांगला मिळत असतो. या फॅटवरच दूधाचा भाव अवलंबून असतो. परंतु, सकस चारा मिळविण्यासाठी येथील शेतक:यांना बरीच धावपळ करावी लागत आहे.
पशुधन कमी होण्याच्या मार्गावर
चा:या अभावी मालपूरसह परिसरात पशूधन कमी होण्याच्या मार्गावर आले आहे. पावसाळ्यात पाळीव प्राणी सहज पोसले जातात. परंतु, उन्हाळ्यात जनावरांना पोसणे शेतक:यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, चारा नसल्याने दुधाच्या प्रमाणातही घट झाली आहे. येथील बहुतांश शेतकरी कापूस, कांदा, मिरची आदी नगदी पिके मोठय़ा प्रमाणावर घेत असल्यामुळे चा:यासाठी येथील शेतक:यांना भटकंती करावी लागते.
चारा छावण्या सुरू कराव्यात
मालपूर येथील दुग्ध व्यवसायाला अधिक चालना व प्रेरणा मिळण्यासाठी दानशूर व्यक्तींनी चारा छावण्या सुरू कराव्यात, गो-सेवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.