धुळ्यात परतल्यानंतर चंदू चव्हाणांना अश्रू अनावर

By Admin | Published: March 11, 2017 03:06 PM2017-03-11T15:06:38+5:302017-03-11T15:06:38+5:30

पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण शनिवारी सकाळी धुळ्यात दाखल झाले आहेत.

Chandu Chavan is tears after returning to Dhule | धुळ्यात परतल्यानंतर चंदू चव्हाणांना अश्रू अनावर

धुळ्यात परतल्यानंतर चंदू चव्हाणांना अश्रू अनावर

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 11 - पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण शनिवारी  सकाळी धुळ्यात दाखल झाले आहेत. यावेळी मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
 
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेदेखील यावेळी होते. धुळ्यात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन चंदू चव्हाण बोरविहीरकडे रवाना झाले. यावेळी, सुभाष भामरे यांनी, चंदू यांना सुखरूप परत आणून त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द पाळला,  अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आधी आजीच्या अस्थिंचं विसर्जन करणार असल्याचं चंदू यांनी सांगितले.
 
चंदू चव्हाण २९ सप्टेंबर २०१६ रोजी चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. डॉ. भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. त्यास यश मिळून २१ जानेवारीला अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे चव्हाण यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आले. स्वत: डॉ. भामरे या वेळी उपस्थित होते. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे प्रथमच आगमन होत आहे.
 
 

Web Title: Chandu Chavan is tears after returning to Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.