वैद्यकीय तपासणीनंतरच चंदू येणार गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 12:37 AM2017-01-23T00:37:24+5:302017-01-23T00:37:24+5:30

डॉ़ सुभाष भामरे : चंदू सध्या अमृतसरला; तीन-चार दिवसांची प्रतीक्षा

Chandu will go to the village after medical examination | वैद्यकीय तपासणीनंतरच चंदू येणार गावाकडे

वैद्यकीय तपासणीनंतरच चंदू येणार गावाकडे

googlenewsNext

धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण सध्या अमृतसरला आहे. त्याठिकाणी सैन्याच्या नियमानुसार सर्व आवश्यक  वैद्यकीय तपासणी  आणि चौकशी पूर्ण झाल्यावर तीन ते चार दिवसांनी ते गावाकडे येऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी रविवारी धुळ्यात दिली़ चंदूच्या कुटुंबीयांनी रविवारी डॉ़ भामरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. चंदू कधी आपल्या गावी बोरविहीरला येणार याची सर्वानाच उत्सुकता आह़े 
डॉ़ भामरे यांची भेट
चंदू चव्हाण बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी  भामरे यांना साकडे घातले होत़े डॉ़ भामरे यांनी बोरविहीर येथे चंदूच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चंदूला नक्की परत आणू, असे आश्वासन दिले होत़े चंदूच्या सुखरूप परतीने त्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.   चंदू यांचे मोठे बंधू  भूषण आणि आजोबा चिंधा पाटील यांनी रविवारी सकाळी धुळ्यात डॉ. भामरे यांची त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला़ यावेळी बोरविहीर येथील युवकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रक्रियेनंतर होणार निर्णय
चंदूच्या सुखरूप परतीबद्दल दिलेला शब्द आपण पाळला. यासंदर्भात आपण पाकिस्तानच्या लष्करी अधिका:यांशी  आठवडय़ात दोनदा बोलायचो. तसेच संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांच्यावर दबाव निर्माण केल्यामुळेच हे होऊ शकले, असे भामरे यांनी सांगितले. आपण अमृतसरलासुद्धा जाऊन चंदूची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कालिका माता मंदिरात दर्शन
त्यानंतर चंदूच्या कुटुंबीयांनी  कालिका मातेचे दर्शन घेतल़े अखिल भारतीय यज्ञोपवित बहुउद्देशीय संस्थेतर्फे चंदू बेपत्ता झाल्यानंतर कालिका माता मंदिरात होमहवन करून सर्व मंदिरांमध्ये चंदूच्या कुटुंबीयांच्या हस्ते आरती करण्यात आली होती़ त्यानुसार चंदू सुखरूप मायदेशी परतला़ चंदू गावाकडे आल्यानंतरही त्याच्या हस्ते मंदिरात आरती करणार असल्याचे संस्थेचे पदाधिकारी अनिल दीक्षित यांनी सांगितल़े यावेळी महेश कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, राम जोशी उपस्थित होत़े चंदूच्या कुटुंबीयांनी सर्वाचे आभार मानल़े


 

Web Title: Chandu will go to the village after medical examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.