एटीएम कार्ड बदलून विद्याथ्र्याला 39 हजारात गंडा
By admin | Published: April 23, 2017 04:37 PM2017-04-23T16:37:30+5:302017-04-23T16:37:30+5:30
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आह़े
ऑनलाइन लोकमत
शिरपूर, जि. धुळे, दि. 23 - ‘मिनी स्टेटमेंट’ पाहण्याच्या बहाण्याने एटीएमकार्ड बदलून विद्याथ्र्याच्या बँक खात्यातून 39 हजार 500 रूपये काढून फसवणूक केल्याची घटना शिरपूर शहरात घडली आह़े याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आह़े
याबाबत राहुल दयाराम पाटील (रा़ फत्तेपूर ता़ जामनेर, जि़ जळगाव) या विद्याथ्र्याने शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात त्याने म्हटले आहे की, शहरातील गुजराथी कॉम्पलेक्समधील एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेलो असता तेथे त्याने मिनी स्टेंटमेंट काढल़े तेव्हा जवळ उभ्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे स्टेंटमेंट पाहण्याचा बहाणा करून त्याचे एटीएमकार्ड बदलविल़े नंतर त्याद्वारे विद्याथ्र्यांच्या बँक खात्यावरील 39 हजार 500 रूपये एटीएममधून काढून फसवणूक केली़ याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े